Astrology : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींचे भाग्य उजळणार, नवपंचम योग पैशांचा पाऊस पाडेल

मुंबई तक

13 Oct 2026 (अपडेटेड: 13 Oct 2026, 12:37 PM)

Astrology : धावपळीच्या जीवनात, ज्योतिष आणि ग्रहांच्या हालचाली नेहमीच कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत. एखादा ग्रह आपली भ्रमणरेषा बदलेल आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला एक उत्सुकता राहिलेली असते. याच संबंधित ऑक्टोबर महिन्याक एक अत्यंत विशेष खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय घटना घडणार आहे, जी काही विशिष्ट राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील. 

Google CTA
Astrology

1/5

धावपळीच्या जीवनात, ज्योतिष आणि ग्रहांच्या हालचाली नेहमीच कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत. एखादा ग्रह आपली भ्रमणरेषा बदलेल आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला एक उत्सुकता राहिलेली असते. याच संबंधित ऑक्टोबर महिन्याक एक अत्यंत विशेष खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय घटना घडणार आहे, जी काही विशिष्ट राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील. 
 

Astrology

2/5

वैदिक पंचांगानुसार, 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.58 वाजतका मंगळ ग्रह आणि शनी ग्रहांत अचूक असा 120 अंशाचा एक कोन तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या या विशेष अंतराला आणि स्थितीला नव पंचम योग म्हटले जाते. विशेष म्हणजे मंगळ ग्रह हा सध्या सर्वात खालच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत असून गुरूच्या उपस्थितीमुळे एक अत्यंत नीचभंग राजयोगाची निर्मिती होत आहे. ज्यामुळे या योगाचा प्रभाव आणखी शक्तीशाली होणार आहे. यामुळे आता काही राशींना मोठा फायदा होईल आणि पैशांचा पाऊस पडेल. 

Astrology

3/5

कर्क 

या दुर्मिळ ग्रहस्थितीचा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा फायदा कर्क राशीच्या लोकांना होईल. करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. या राशीतील लोकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, मात्र कामाचा ताण थोडा वाढू शकतो आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या ही दुसरी भाग्यवान राशी ठरत आहे. मंगळ ग्रह तुमच्या चंद्र राशीपासून अकराव्या घरात जाणार आहे आणि वक्री शनी सातव्या घरात आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन आणि आश्वासक मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. या काळात, तुम्ही नवीन लोकांशी संबंध जोडाल आणि तेच व्यक्ती भविष्यात आपल्यासाठी उपयुक्त ठरतील. दिर्घकाळाच्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळेल. 
 

Astrology

5/5

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी असणार आहे, कारण शनीदेव हा दुसऱ्या घरात आणि मंगळ ग्रह हा सहाव्या घरात भ्रमण करत आहे. तुम्हाला व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. लोकांची वाढलेल्या ओळखीमुळे भविष्यात करिअर आणि व्यवसायाला चालना मिळू शकते. 
 

हे वाचलं का?