Astrology : बुध आणि शनीमुळे षडाष्टक योगाची निर्मिती, 'या' राशींना सावधानतेचा इशारा

मुंबई तक

• 12:08 PM • 06 Oct 2026

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची परस्पर स्थिती मानव जीवनावर खोलवर परिणाम करतात. ग्रहांची स्थिती अनेकदा बदलते, ज्याला ग्रहांचे गोचर म्हणतात. याचा शुभ आणि अशुभ परिणाम हा ग्रहांच्या योगावर होणार आहे. अशातच ज्योतिषीय गणणेनुसार, 9 ऑक्टोबर रोजी षडाष्टक योग नावाचा एक विशेष ग्रहयोग निर्माण होणार आहे. 

Google CTA
Astrology

1/6

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची परस्पर स्थिती मानव जीवनावर खोलवर परिणाम करतात. ग्रहांची स्थिती अनेकदा बदलते, ज्याला ग्रहांचे गोचर म्हणतात. याचा शुभ आणि अशुभ परिणाम हा ग्रहांच्या योगावर होणार आहे. अशातच ज्योतिषीय गणणेनुसार, 9 ऑक्टोबर रोजी षडाष्टक योग नावाचा एक विशेष ग्रहयोग निर्माण होणार आहे. 
 

Astrology

2/6

ज्योतिषशास्त्रानुसार, षडाष्टक योग अशुभ मानला जातो. अशातच जाणून घेऊयात हा योग नेमका काय आहे आणि त्याचा परिणाम टाळण्यासाठी काही राशींना येत्या काळात विशेष सावधानता बाळगण्याची गरज आहे. 
 

Astrology

3/6

मेष 

षडाष्टक योग हा 9 ऑक्टोबर रोजी निर्माण होणार आहे, मेष राशींच्या काही कठीण परिस्थिती आणू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आणि कोणतीही कागदपत्रे किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी अत्यंत सावधानता बाळगण्याची अधिक गरज आहे.  
 

Astrology

4/6

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक आणि आर्थिक दोन्ही आघाड्यांवर आव्हानात्मक असू शकतो. अनावश्यक खर्च वाढून आपल्या बजेटवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात अवाजवी गोष्टींना महत्त्व देणे टाळावे, कारण त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/6

तूळ 

या काळात तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी, मोसमी आजार किंवा जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. नोकरी करणाऱ्यांना प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे.  
 

Astrology

6/6

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ संयमाची परीक्षा घेणारा आहे. व्यवसायात तीव्र स्पर्धेला जावे लागण्याची शक्यता आहे. आपली नियोजित कामे वेळेवर पू्र्ण न झाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे.  

हे वाचलं का?