ज्योतिषशास्त्रात तब्बल 12 वर्षानंतर आला दुर्मिळ योग, 'या' राशीतील लोकांचं नशीब चमकलं
मुंबई तक
08 Jul 2025 (अपडेटेड: 08 Jul 2025, 09:24 AM)
Astrology : 12 वर्षानंतर, असा दुर्मिळ योगायोग घडणार आहे. याचा परिणाम हा इतर तीन राशींवर होणार आहे.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचर आणि युतीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. तब्बल 12 वर्षानंतर, असा दुर्मिळ योगायोग घडणार आहे. सूर्य देव आणि ज्ञान आणि संपत्तीची देवता. गुरू, मिथून राशीत एकत्र बसतील. या युतीमुळे अनेक राशींमध्ये मोठे बदल होतील, परंतु अशा तीन राशी आहेत त्यांचे नशीब चांगलंच चमकेल.


2/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रह हा आत्मविश्वासाचा कारक मानला जातो. तर गुरू हा ज्ञान, समृद्धी आणि आनंदाचा कारक मानला जातो. या दोन शक्तिशाली ग्रहांचे मिलन काही राशींसाठी उत्पन्नात वाढ, करिअरमध्ये वाढ होऊन, आनंदाची बातमी घेऊन येत आहे. याचबाबात एकूण माहिती जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT


3/5
मीन राशी
सूर्य आणि गुरुची युती मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. ही युती तुमच्या राशीच्या चौथ्या घरात वास्तव्य करतो. या काळात मीन राशीतील लोकांच्या सुखसोयीत आणि सुविधांमध्ये प्रचंड वाढ होईल. कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेमाचे वातावरण राहिल. कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेमाचे वातावरण राहील. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.


4/5
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना चांगलं यश मिळेल. सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे कन्या राशीतील लोकांच्या करिअरचा चांगली वाट मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/5
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांसाठी गुरू आणि सूर्याची युती विशेषत: फायदेशीर ठरेल. यामुळे सिंह राशीतील लोकांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून बंपर परतावा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावी संवाद आणि शौलीचा वापर कराल. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्येही नफा मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
