17 सप्टेंबरपासून बुधादित्य योगाची निर्माती होणार, काही राशीतील लोकांना मिळणार पैसाच पैसा
मुंबई तक
• 09:23 AM • 10 Sep 2025
Astrology : ग्रहांच्या हालचालीचा त्यांची युतीवर चांगलाच परिणाम दिसून येतो. याच युतीमुळे 17 सप्टेंबर 2025 रोजी या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे.
ADVERTISEMENT


1/5
ग्रहांच्या हालचालीचा त्यांची युतीवर चांगलाच परिणाम दिसून येतो. याच युतीमुळे 17 सप्टेंबर 2025 रोजी या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे हा योग तयार होणार असल्याचे सांगण्यात येतंय. योग संपत्ती, करिअर आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो.


2/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रह हा सप्टेंबर 2025 मध्ये दुपारी 1 वाजल्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. तर बुध ग्रह हा 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सकाळी 10 नंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह आणि बुध ग्रह यांच्यातील युतीमुळे निर्माण होणारा बुधादित्य योग धन, सन्मान आणि करिअरच्या प्रगतीचा कारक मानला जातो.
ADVERTISEMENT


3/5
मिथून राशी :
मिथून राशीतील लोकांसाठी हा बुधादित्य योग चौथ्या घरात तयार होताना दिसतो. हा योग करिअर आणि व्यवसायात प्रगती दर्शवताना दिसतो. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायदारांना शेअरबाजारात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.


4/5
कन्या राशी :
कन्या राशीतील लग्न भावात तयार होणारा हा योग विशेष लाभदायी असणार आहे. या राशीतील लोकांना समाजात मान सन्मान मिळतो. तसेच प्रेम जीवनात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.
ADVERTISEMENT


5/5
वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीतील लोकांच्या अकराव्या घरात हा योग निर्माण होतो. सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला जातो. आपण मित्रांसोबत घालवलेला वेळ सैदव स्मरणात राहिल. आपण आपला मुद्दा अगदी प्रभावीपणे मांडण्यात यश मिळवाल.
ADVERTISEMENT
