गजकेसरी राज योग होणार निर्माण, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैशांचा पडणार पाऊस, काय सांगतं राशीभविष्य

मुंबई तक

• 09:10 AM • 19 Aug 2025

Astrology : ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग योग शुभ मानला जातो. तसेच याचा परिणाम हा सर्वच राशींवर होताना दिसतो. पण त्यातील तीन राशींना त्याचा अधिक फायदा होताना दिसतो. तर त्या राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेऊयात. 

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीचा काही काही लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम दिसून येतो. चंद्र ग्रह हा सर्वात वेगाने प्रवास करणारा ग्रह आहे. यामुळे तो दर दीड वर्षी आपली राशी बदलतो. अशातच आता चंद्र ग्रहाने 18 ऑगस्ट पासून राशी बदलली असून तो मिथून राशीत प्रवेश करेल. दरम्यान, त्या ठिकाणी गुरु आणि शुक्र त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. 
 

Astrology

2/5

यामुळेच आता त्रिग्रही योग आणि गजकेसरी राजयोग निर्माण होईल. हा योग शुभ मानला जात असून याचा परिणाम हा सर्वच राशींवर होताना दिसतो. पण त्यातील तीन राशींना त्याचा अधिक फायदा होताना दिसणार आहे. तर त्या राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेऊयात. 
 

Astrology

3/5

मिथून राशी 

मिथून राशीतील लोकांमध्ये चंद्र आणि गुरूची युती असणार आहे. यामुळे गजकेसरी राजयोग बळकट होईल. या योगामुळे जीवनात सकारात्मक बदल निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद वाढू शकतो. तुमच्या मुलांकडून मिथून राशीच्या पालकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थांचे चांगले निकाल लागण्याची शक्यता आहे. 

Astrology

4/5

तूळ राशी

हा राजयोग तूळ राशीच्या नवव्या घरात निर्माण होणार आहे. यामुळे तुमचे नशीब तुम्हाला आणखी साथ देईल. अध्यात्माकडे तुमचा कल असणार आहे. तुम्ही धार्मिक यात्रा किंवा पूजा करू शकता, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.तुम्हाला अपार कष्टायचे फळ मिळण्याचे योग तयार झाले आहेत. 
 

Astrology

5/5

कुंभ राशी 

कुंभ राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा चांगला फायदा निर्माण होणार आहे. यामुळे कुंभ राशीतील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच जुन्या इच्छा पूर्ण होऊन उत्पन्नात वाढ निर्माण वाढेल. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp