12 वर्षानंतर गुरु आणि मंगळ ग्रहाची युती, 13 सप्टेंबरपासून काही राशींतील लोकांच्या भाग्याचे उघडणार दरवाजे, काय सांगतं राशीभविष्य?
मुंबई तक
09 Sep 2025 (अपडेटेड: 09 Sep 2025, 09:32 AM)
astrology : नवपंचम राजयोग निर्माण झाल्याने काही राशीतील लोकांना चांगला फायदा मिळणार आहे, त्याबाबत पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रात तब्बल 12 वर्षानंतर गुरु ग्रहाची मंगळ ग्रहाशी युती होणार आहे. या युतीचा मंगळवारी 13 सप्टेंबरपासून काही राशींना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुरू ग्रह आणि मंगळ ग्रहाच्या झालेल्या युतीला नवपंचम राजयोग असेही म्हणतात.


2/5
नवपंचम राजयोग निर्माण झाल्यानंतर गुरू ग्रह मिथुन राशीत आहे. तर मंगळ ग्रह हा मिथून राशीत चौथ्या घरात आहे. याचमुळे हा नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. याचा फायदा तीन राशींना होणार आहे, त्या जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT


3/5
सिंह राशी :
सिंह राशीतील लोकांच्या आयुष्यात नवपंचम राजयोगाचा मोठा फायदा निर्माण होणार आहे. या राशीतील लोकांना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. वेतनात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच आपल्या स्पर्धकांवर मात कराल.


4/5
मीन राशी :
मीन राशीतील लोकांना या गुरु आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा चांगला परिणाम होईल. घरात आणि कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये सुरू असलेली आव्हाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/5
कुंभ राशी :
नवपंचम राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा एक नवीन टप्पा घेऊन येईल. अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रस वाढेल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील आणि सहकाऱ्यांसोबतचे वातावरण अनादी राहील.
ADVERTISEMENT
