ऑगस्ट महिन्यात लक्ष्मी नारायण योग, काही राशीतील लोकांचं नशीब फळफळेल, तुमच्या राशीचं भविष्य घ्या जाणून

मुंबई तक

08 Aug 2025 (अपडेटेड: 08 Aug 2025, 09:52 AM)

astrology : कर्क राशीत शुक्र आणि बुध या ग्रहांचे आगमन होणार आहे.  यांच्या आगमनाने एक शुभ लक्ष्मी नारायण योग तयार झाल्याने काही राशीतील लोकांच्या आयुष्य़ात परिणाम होईल.

follow google news
Astrology

1/5

कृष्णजन्माष्टमी ही 16 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. त्यानंतर ग्रहांची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. कर्क राशीत शुक्र आणि बुध या ग्रहांचे आगमन होणार आहे.  यांच्या आगमनाने एक शुभ लक्ष्मी नारायण योग तयार होईल. वैदिक ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, हा योग खूप लाभदायी आणि फलदायी असणार आहे. 

Astrology

2/5

बुध ग्रह हा कर्क राशीत प्रवेश करेल, त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम हा काही राशींवर होईल. त्यापैकी तीन राशींचा यात समावेश आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.

Astrology

3/5

मेष राशी : 

कृष्ण जन्माष्टमीनंतर, 21 ऑगस्ट रोजी, शुक्र ग्रह हा मेष राशीतील कुंडलीच्या चौथ्या घरात भ्रमण करणार आहे. मेष राशीतील लोक अनेक नवीन वस्तू खरेदी करतील, जसे की नवीन घर खरेदी करणे, गाडी खरेदी करणे तसेच घर सजवणे यासारख्या दीर्घकाळापासून अपूर्ण असलेल्या इच्छा आता पूर्ण  होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि सुसंवाद वाढेल आणि नातेवाईकांकडून मदतीसह आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

कर्क राशी :

या भ्रमणाचा थेट परिणाम हा कर्क राशीवर होण्याची शक्यता आहे, कारण शुक्र ग्रह हा कर्क राशीतील लोकांच्या कुंडलीच्या पहिल्या घरात येतो. याचा तुमच्या व्यक्तिमत्वार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडण्याची शक्यता आहे. लोकांचे तुमच्याकडील आकर्षण वाढू शकते. कला, लेखन संगीत आणि फॅशनशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी फायदे मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लग्नाचे योग आहेत. 

Astrology

5/5

कन्या राशी :

कन्या राशीतील लोकांच्या कुंडलीच्या अकराव्या स्थानकात शुक्र ग्रहाचेवास्तव्य असणार आहे. याचा नफा आणि उत्पन्नाशी थेट संबंध निर्माण झाला आहे. या वेळी तुमचे नशीब चमकू शकते, तसेच नोकरदारांना चांगला बोनस मिळण्याची शक्यता आहे. जुने कर्ज परत मिळणे असो किंवा गुंतवणूकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. मित्रांना आणि नातेवाईकांना नवीन संधी निर्माण होतील, असे ज्योतिषशास्त्र सांगतं.

हे वाचलं का?
follow whatsapp