मंगळाचा महागोचर योग, काही राशीतील लोकांच्या जीवनात धोक्याचं सावट
मुंबई तक
• 12:34 PM • 19 Nov 2025
Astrology : ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, ग्रहांचा अधिपती अशी ओळख असलेल्या मंगळ ग्रहाचे एक महत्त्वाचे संक्रमण निर्माण झाले आहे. मंगळ ग्रहाने त्याच्या स्वत:च्या वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. याचा आता काही राशीतील लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, ग्रहांचा अधिपती अशी ओळख असलेल्या मंगळ ग्रहाचे एक महत्त्वाचे संक्रमण निर्माण झाले आहे. मंगळ ग्रहाने त्याच्या स्वत:च्या वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. याचा आता काही राशीतील लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

2/5
ज्योतिषी मानतात की, कुंडलीत मंगळाची मजबूत स्थिती व्यक्तीला निर्भर बनवण्याचा प्रयत्न करते. अनेकदा कमकुवत स्थितीत आरोग्याच्या संबंधित समस्या आणि जीवघेण्या अडचणी निर्माण येतात. याचा काही राशीतील लोकांना काही दिवस सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांच्या जीवनात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. याचा काही राशीतील लोकांच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम होईल, याची एकूण माहिती पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT

3/5
धनु राशी :
मानसिक शांती भंग होऊ शकते आणि अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक योजनांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबातील सदस्यांशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.

4/5
मेष राशी :
मेष राशीतील लोकांमध्ये या काळात आत्मविश्वास आणि अहंकार वाढू शकतो. तसेच या राशीतील लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी वाद टाळा आणि वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्या, कारण अपघात होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.
ADVERTISEMENT

5/5
वृषभ राशी :
वृषभ राशीतील लोकांच्या खर्चात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील संवादाचा अभाव तणाव निर्माण करू शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि व्यवसाय भागीदारीबाबत सावधगिरी बाळगा.
ADVERTISEMENT







