रक्षाबंधन 2025 : शनि आणि मंगळाचा समसप्तक योग, कसं असेल बहीण भावाचं नातं?
मुंबई तक
• 09:39 AM • 09 Aug 2025
astrology : रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना समस्या निर्माण होऊ शकतात. ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, शनि ग्रह आणि मंगळ ग्रहाचे विशेष संयोजन निर्माण झाले आहे, त्यालाच समसप्तक योग असेही म्हणतात.
ADVERTISEMENT


1/5
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींना समस्या निर्माण होऊ शकतात. ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, शनि ग्रह आणि मंगळ ग्रहाचे विशेष संयोजन निर्माण झाले आहे, त्यालाच समसप्तक योग असेही म्हणतात. मेष, मिथुन आणि कर्क या राशीच्या लोकांसाठी हे संयोजन विशेषतः आव्हानकारक ठरू शकतं.


2/5
करिअर आणि व्यवसायात अडथळे
ज्योतिषशास्त्राने करिअर आणि व्यवसायात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. ज्योतिषी म्हणतात की, या योगामुळे नोकरी करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या कामात खोळंबा येण्याची शक्यता आहे. जर निष्काळजीपणा केला तर मोठे नुकसान होण्याची संभावना बळावू शकते.
ADVERTISEMENT


3/5
आर्थिक धोका
मोठ्या प्रमाणात आर्थिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम हा आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो. अनावश्यक खर्च वाढू शकतात, ज्यामुळे बँकेतील शिल्लक रकमेवर परिणाम होईल. गुंतवणूक करणे किंवा मोठे आर्थिक व्यवहार टाळावे, कारण आर्थिक नुकसानीची शक्यता असते.


4/5
नातेसंबंधांमध्ये तणाव
नातेसंबंधांमध्ये तणावाची शक्यता असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. कारण शनि ग्रह आणि मंगळा ग्रहाच्या युतीचा वैयक्तिक जीवनावरही काही अंशी परिणाम होण्याची चिन्हे आहेत. वाढत्या चिडचिडेपणामुळे कुटुंब आणि वैवाहिक जीवनात तणाव किंवा कलह वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याचा धोका आहे. यावेळी अगदी संयम आणि समजूतदारपणे काम करण्यास ज्योतिषी सांगतात.
ADVERTISEMENT


5/5
मेष, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांना या योगाचा सर्वात जास्त परिणाम सहन करावा लागू शकतो.
ADVERTISEMENT
