दिवाळीआधी काही राशींचं नशीब फळफळणार, नोकरी आणि प्रमोशनची संधी चालून येणार
मुंबई तक
25 Sep 2025 (अपडेटेड: 25 Sep 2025, 09:09 AM)
Astrology : शनि ग्रह हा कर्म आणि न्यायाचा देव मानला जातो. हा ग्रह वेळोवेळी नक्षत्र बदलतो, याचा परिणाम हा इतर राशींवर होताना दिसतो.
ADVERTISEMENT


1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह हा कर्म आणि न्यायाचा देव मानला जातो. हा ग्रह वेळोवेळी नक्षत्र बदलतो, याचा परिणाम हा इतर राशींवर होताना दिसतो.


2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रहाला परत येण्यासाठी सुमारे 30 वर्षांचा कालावधी लागतो. तर एकूण नक्षत्रांमधून त्यांचे चक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 27 वर्षांचा कालावधी लागतो. अशातच सध्या, शनि ग्रह हा मीन राशीत विक्री राहणार आहे.
ADVERTISEMENT


3/5
कर्क राशी :
शनि ग्रहाच्या नक्षत्र बदलाचा परिणाम कर्क राशीच्या लोकांसाठी महत्वाचा असतो. या राशीच्या नवव्या घरात शनि ग्रहाचे वास्तव्य असेल, यामुळे भाग्यवान योग निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हा गुंतवणूकदारांसाठी योग्य असल्याचं समजतंय. यामुळे चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.


4/5
मीन राशी :
भाद्रपद नक्षत्रात शनि ग्रहाचा प्रवेश हा मीन राशीतील लोकांसाठी अगदी फलदायी आहे. यामुळे नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात चांगली प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप मिळेल.
ADVERTISEMENT


5/5
शनी ग्रहाचे संक्रमण कुंभ राशीसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या एकूण काळामध्ये आत्मनिरीक्षण केल्याने कुंभ राशीतील लोकांचे कौतुक होईल आणि व्यक्तिमत्व वाढेल. या राशीतील लोकांचा संवाद गोड राहिल आणि लोक याला प्रभावित होतील.
ADVERTISEMENT
