Astrology: आज सुर्याचं कुंभ राशीत गोचर! 'या' राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू; अफाट धनसंपत्ती अन्...

मुंबई तक

• 11:41 AM • 13 Feb 2026

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खूप खास आहे. शुक्रवार, 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:08 वाजता सूर्य देवांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश झाल्याने राहु, बुध आणि शुक्र यांच्यासोबत एक शक्तिशाली संयोग तयार होत आहे. त्यामुळे काही खास राशींच्या लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल होणार आहे.

follow google news
सुर्याचं कुंभ राशीत गोचर

1/7

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खूप खास आहे. शुक्रवार, 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:08 वाजता सूर्य देवाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. याला 'कुंभ संक्रांती' म्हणतात. विशेष, आज विजया एकादशीचे पवित्र व्रत देखील आहे. या दुर्मिळ योगायोगामुळे पाच भाग्यवान राशीच्या लोकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. 
 

'या' राशींच्या लोकाच्या जीवनात लक्षणीय बदल

2/7

सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश झाल्याने राहु, बुध आणि शुक्र यांच्यासोबत एक शक्तिशाली संयोग तयार होत आहे. त्यामुळे काही खास राशींच्या लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल होणार आहे. 
 

वृषभ

3/7

वृषभ: सूर्य वृषभ राशीच्या दहाव्या घरात (करिअर) गोचर करत आहे. त्यामुळे, वृषभ राशींच्या लोकांची प्रलंबित सरकारी आणि प्रशासकीय कामे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 
 

कर्क

4/7

कर्क: सूर्याच्या आठव्या घरातील प्रवेशामुळे कर्क राशीच्या लोकांच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल. नवीन स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे. या काळात, कौटुंबिक आजार दूर होतील आणि जोडीदारासोबतचे तुमचं नातं अधिक प्रेमळ होईल. 
 

सिंह

5/7

सिंह: सिंह राशीचा अधिपती ग्रह असलेला सूर्य सातव्या घरात गोचर करत आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि भागीदारीत तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवून देण्याची शक्यता आहे.
 

वृश्चिक

6/7

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या पाचव्या घरात सूर्याचे गोचर होत असल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आनंदाची बातमी मिळू शकते. आज, वृश्चिक राशीच्या लोकांचं बोलणं प्रभावी असेल, मुलाखती आणि बैठकांमध्ये लोकांचं मन जिंकण्यास मदतशीर ठरेल आणि तुमची सामाजिक प्रतिमा लक्षणीयरीत्या सुधारेल.
 

धनु

7/7

धनु: सूर्याचा चौथ्या घरात गोचर होत असल्याने धनु राशीच्या लोकांना सुखसोयी प्राप्त होतील. बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नुकत्याच दिलेल्या परीक्षेत यश मिळण्याची देखील शक्यात आहे. फक्त कठोर परिश्रम करत राहा, यश निश्चित आहे.
 

हे वाचलं का?
follow whatsapp