पुण्यात हिट अँड रन.. नवले ब्रिजवर मर्सडिजने दुचाकीस्वारांना चिरडलं; एकाच दिवशी दोन अपघात

​​​​​​​Pune Hit And Run : पुण्यातील नवले पूलावर एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. दुचाकीस्वारांना मर्सडिजने ठोकर देत चिरडलं आहे. तर दुसऱ्या अपघातात एका ट्रकने दोन दुचाकीस्वार आणि दोन रिक्षांना धडक दिली.

Pune Hit And Run Latest News

Pune Hit And Run Latest News

मुंबई तक

• 07:53 PM • 05 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पु्ण्यातील नवले ब्रिजवर दुचाकीस्वारांना मर्सडिजने ठोकर देत चिरडलं

point

पु्ण्यात हिट अँड रनची पुनरावृत्ती

point

पुण्यात एकाच दिवशी दोन अपघात

Pune Hit And Run: पुणे: पुण्यात मागील वर्षी म्हणजेच 19 मे 2024 रोजी कंत्राटदाराच्या अल्पवयीन मुलाने निष्पापांना पोर्शे कारनं चिरडलं होतं. यामध्ये दोन निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाला 19 मे 2025 रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यानंतर पुण्यातच पुणे पोर्शे प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. पुणे-बंगळूरू महामार्गाला लागून असणाऱ्या नवले पुलावर एका मर्सडिजने निष्पाप दुचाकीस्वाराला ठोकर देत चिरडलं. ही घटना 3 मे 2025 रोजी पहाटे 4.30 वाजता  घडली आहे. तर याच दिवशी दुसरी अपघाताची घटनाही नवले पुलावरच घडली आहे. एकाच दिवशी नवले पुलावर अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत.

हे वाचलं का?


हे ही वाचा: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्वीस्ट, 'त्या' आरोपींच्या वकिलाचे पोलिसांवरच धक्कादायक आरोप

पुणे-बंगळुरू महामार्गवर असणाऱ्या नवले ब्रिजवरील पहिल्या अपघातात दुचाकी पुलावर घडली. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आणि दुसऱ्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, मृत तरुणाचे नाव हे कुणाल हुशार असून तो चिंचवड येथे राहत होता. अशातच पुण्यातील नवले ब्रिजवर अशा सर्रास घटना घडताना दिसून येतात. यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या घटनांमुळे पुण्यातील वाहतूक नियंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

कारचालकांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या अपघातात एकचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच या प्रकरणात दोन कारचालकांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे  वृत्त आहे. या संबंधित प्रकरणात पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. 

हे ही वाचा : 'हा बघा कोयता गँगचा कालचा थरार..' रोहित पवारांनी थेट दाखवला Video, काका अजित पवारांना घेरलं

यावर आता पोलिसांनी माहिती दिली आहे की, कार चालक मद्यधुंद होता की नाही याची चाचणी करण्यासाठी अल्कोहोल डिटेक्शनची चाचणी करण्यात आली. डीसीपी कदम यांनी संबंधित प्रकरणावर भाष्य केलं की, दुचाकी आणि कारच्या धडकेनंतर कुणाल हुशार आणि त्याच्या जखमी मित्राला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तर कुणालच्या दुचाकीमागे बसलेल्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवले पुलावर एकाच दिवशी दोन अपघात

तर अशीच दुसरी घटना दुपारी घडली आहे. एका ट्रकने दोन दुचाकीस्वार आणि दोन रिक्षांना धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ट्रक हा कात्रजवरून नवले पुलाच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला होता. नवले पुलावर आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रकने गाड्यांना ठोकर दिली.

    follow whatsapp