Maharashtra HSC Board Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज म्हणजेच 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12 वी) चा निकाल जाहीर करेल. निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल, त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर थेट लिंक सक्रिय केली जाईल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवलं, 23 वर्षीय कुणाल जागीच ठार, एक जण जखमी; कारमध्ये कोण कोण होतं?
गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र बोर्ड निकाल जाहीर होताच टॉपर्सची यादी जाहीर करत नाही. यावर्षीही टॉपर्सची नावे बोर्डाकडून जाहीर केली जाणार नाहीत. निकाल विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक प्रवाह, आयटीआय या स्ट्रीम्सनुसार जाहीर केला जाईल.
पत्रकार परिषदेत महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीचा निकाल जाहीर केल्यानंतर खाली दिलेल्या वेबसाइटवर निकाल दिसेल. विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यापैकी कोणत्याही साइटचा वापर करून निकाल तपासू शकतील-
mahresult.nic.in
results.gov.in
results.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in
निकाल तपासण्याची पद्धत
हे ही वाचा >> "चित्रपटात कामाचं आमिष दाखवून...", 'हाऊस अरेस्ट'मुळे वादात सापडलेल्या एजाजवर आता काय आरोप?
महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर होताच, विद्यार्थ्यांना आधी वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जावे लागेल आणि साइटच्या होम पेजवरील निकालाच्या सक्रिय लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव प्रविष्ट करावं लागेल आणि 'Result' या बटणावर क्लिक करावं लागेल. आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. इथेच तुम्ही तो डाउनलोडही करू शकता.
ADVERTISEMENT











