'हा बघा कोयता गँगचा कालचा थरार..' रोहित पवारांनी थेट दाखवला Video, काका अजित पवारांना घेरलं

मुंबई तक

पुण्यातील भररस्त्यात कोयत्याने सपासप वार, पालकमंत्री अजित काकांना पुतण्या रोहितने लक्ष घालण्याची केली विनंती, घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पुण्यातील बिबवेवाडीत घडला धक्कायक प्रकार

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील  बिबवेवाडीतील भररस्त्यात कोयत्याने सपासप वार

point

रोहित पवारांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष घालण्याची केली विनंती

point

घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

Pune Crime News: पुणे: पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे सत्र कायम दिसत आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्यात कोयता गँगसारख्या टोळ्या उदयास आल्या आहेत. अशातच पुण्यातील बिबवेवाडीतील भरस्त्यात दोन गटात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील काही जणांवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. हा घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने बिबवेवाडी हादरून गेली आहे. या व्हिडिओचे अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. यामुळे वाढत्या गुन्हेगारीने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, समोर चारचाकी वाहनं उभी आहेत. त्याच्यासमोर काही जणांमध्ये आधी बाचाबाची सुरू झाली.पण त्याचवेळी त्याठिकाणी एका तरुणाने हातातील कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तरुण कोयता घेऊन थेट दुसऱ्या तरुणावर वार करताना दिसून आला. त्यावेळी या बाचाबाचीत तरुणाचा शर्ट फाटला. तर दुसऱ्या गटातील तरुण हा रस्त्यावर पडला. अशातच इतर तरुणांपैकी आणखी एक तरुण हातात सपाट असणारा दगड घेत भिरकावताना दिसून आला. या सगळ्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही गटातील तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला.

हे ही वाचा>> बाहेरच्या मुस्लिमांना मशिदीत नो एन्ट्री... पुण्यातील ग्रामपंचतींचा ठराव काय? 'पहलगाम'नंतर तणाव

या प्रकरणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता या प्रकरणात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. अशा घडणाऱ्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालावे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यामध्ये लक्ष द्यावे अशा आशयाचे ट्विट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

हे ही वाचा>> Pune: पत्नीचे अनैतिक संंबंध असल्याचा संशय, पतीने असं काही केलं की पोलीस गेले चक्रावून!

रोहित पवार यांचं ट्विट

"पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!," असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp