Pune: पत्नीचे अनैतिक संंबंध असल्याचा संशय, पतीने असं काही केलं की पोलीस गेले चक्रावून!
Pune Crime News: इंदापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे, याच आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. 3 महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपी पतीसह दोघांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

इंदापूरमध्ये धक्कादायक प्रकरण

पतीनेच केला होता पत्नीचा खून

3 महिन्यांनंतर झाला प्रकरणाचा उलगडा
Pune Crime News : पुणे जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये हादरवून सोडणारी गुन्हेगारीची प्रकरणं समोर आली आहेत. अशातच इंदापूरमध्येही अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर सगळेच हादरलेत. कारण ज्या व्यक्तीने मृत महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती, तोच या प्रकरणात आरोपी निघाला आहे. आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून, मृत महिलेचा पतीच आहे.
हे ही वाचा >> आईस्क्रीम खाताना कॅफे मालकावर हल्ला, धडाधड गोळ्या घालून संपवलं, तपासातून उघड झालं धक्कादायक प्रकरण
इंदापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, याच आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. 3 महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपी पतीसह दोघांना अटक केली आहे.
पत्नीची हत्या करुन, मृतदेह नाशिकमध्ये दरीत फेकला
पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली होती. त्यानंतर पत्नीचा मृतदेह सुमारे 300 किमी लांब असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या डोंगरात 150 फूट दरीत फेकून दिला होता. तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना असं आढळून आलं की, पत्नीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणारा पतीच या प्रकरणात आरोपी आहे. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे.
या प्रकरणी महिलेचा पती ज्योतिराम आबा करे (रा. काळशी, तालुका इंदापूर) आणि त्याचा मित्र दत्तात्रेय शिवाजी गोलांडे (रा. गोलंडेवस्ती, इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.