बाहेरच्या मुस्लिमांना मशिदीत नो एन्ट्री... पुण्यातील ग्रामपंचतींचा ठराव काय? 'पहलगाम'नंतर तणाव
गावांमधील सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पहलगाम हल्ल्याचे देशभरात पडसाद

पुण्यातील मुळशीमधील ग्रामपंचायतींचे ठराव

गावातील मशिदीत बाहेरच्या मुस्लिमांना येण्यास मनाई
Pune Mulashi : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे परिणाम देशभर झाल्याचं दिसतंय. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात तर एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. अनेक गावांमध्ये तणाव वाढला असून, घोटावडे, पिरंगुट, वडकी आणि लवळे या गावांच्या ग्रामपंचायतींनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. बाहेरील मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यास बंदी घालणारे ठराव या ग्रामपंचायतींनी मंजूर केले आहेत.
हे ही वाचा >> Pahalgam Attack: 'चुन-चुनकर मारेंगे', अमित शाह पहिल्यांदाच बोलले एवढं स्पष्ट; मोठं काही तरी घडणार?
गावांमधील सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. दर शुक्रवारी मशिदींमध्ये वाढणारी गर्दी कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करू शकते, त्यामुळे फक्त गावातील स्थानिक रहिवासीच मशिदीत नमाज अदा करू शकतील, असं ठरावात म्हटलं आहे.
पिरंगुटचे पोलिस पाटील प्रकाश पवळे म्हणाले की, गावातील शांतता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक मुस्लिम समाजात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लवळे गावातील शैस्तेखान इनामदार म्हणाले, पूर्वी आम्ही गावातील मशिदीपासून दूर असलेल्या शेडमध्ये नमाज अदा करायचो, आता परिस्थिती जास्त भयावह झाली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जातीय तणाव वाढला
पिरंगुट सुन्नी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष नबिलाल शेख म्हणाले की, ही मशीद संपूर्ण तालुक्यातील सर्वात मोठी मशीद आहे. बाहेरूनही लोक इथं येतात. आता आमचे नातेवाईकही नमाज पठणासाठी येऊ शकणार नाहीत. 76 वर्षांत पहिल्यांदाच असं वातावरण पाहायला मिळालं आहे.
हे ही वाचा >> महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असलेली भेंडवळची भविष्यवाणी हा नेमका प्रकार आहे तरी काय?
कोणीही तक्रार दाखल केलेली नाही?
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने तक्रार दाखल केलेली नाही. हा निर्णय सर्व समुदायांच्या संमतीने घेण्यात आला आहे असंही पोलीस म्हणाले.