पुणे : पुण्यात झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा राज्यभरात झाली. सुनांचा छळ करणाऱ्या कुटुंबांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. हडपसर परिसरात सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरे, दीर आणि नातेवाइकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> हात-पाय बांधून मारहाण, सोल्डरींग मशिनने चटके! 25 लाखाची मागणी करत सुनेला छळणाऱ्या 6 जणांना...
सासरच्या लोकांवर गुन्हा, पतीला अटक
मृत विवाहितेचं नाव प्रतिक्षा अभिषेक खलाडकर (वय 27) असं आहे. तिचा पती अभिषेक आनंद खलाडकर, सासरे आनंद खलाडकर, सासू सविता खलाडकर, दीर चेतन खलाडकर, नणंद वैभवी खलाडकर (सर्व रा. धनकवडी) आणि निर्मला आवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक्षाच्या आई उषा राजेंद्र हरपळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पती अभिषेक खलाडकर याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा आणि अभिषेक यांचा विवाह 11 जून 2020 रोजी झाला होता. लग्नात हरपळे कुटुंबाने सात तोळे सोन्याचे दागिने हुंडा म्हणून दिले होते. तसेच, सोने आणि लग्नाचा खर्च मिळून एकूण 15 लाख रुपये खर्च झाले होते.
हे ही वाचा >> काकीनं पुतण्याला संपवलं, मृतदेहाचे तुकडे सिमेंटच्या... पुन्हा 'मेरठ'सारखीच घटना, अश्लील फोटोवरुन...
मात्र, प्रतिक्षाला सासरच्या मंडळींकडून सातत्याने टोमणे आणि छळ सहन करावा लागला. या जाचाला कंटाळून 6 एप्रिल रोजी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतिक्षाच्या आई उषा हरपळे यांनी तक्रार दाखल करत मुलीने सासरच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करत आहेत.
ADVERTISEMENT
