Crime News: उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एका महिलेने आपल्याच पतीला जाळून त्याची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. संबंधित महिलेचा पती तिला दुसऱ्या पुरुषासोबत बोलण्यापासून रोखत असल्यामुळे तिने तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना रमाला पोलीस स्टेशन हद्दीतील कंडेरा गावात घडल्याचं समोर आलं आहे. घटनेतील मृत व्यक्तीचं नाव सन्नी असून तो याच गावाचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. 22 जुलै रोजी भगवान शंकराचा भक्त बनून तो कावड घेण्यासाठी हरिद्वारला गेला होता. पण ही त्याच्या आयुष्यातील शेवटची यात्रा असेल, याची त्याला कल्पना देखील नव्हती.
ADVERTISEMENT
पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध
पीडित तरुणाची पत्नी अंकिताचे अय्यूब नावाच्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा सन्नीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. आरोपी महिलेच्या पतीने तिला अनेकदा फोनवर तिच्या प्रियकराशी बोलताना पकडले होतं. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, अय्यूबमुळे दोघे पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. याच कारणामुळे अंकिता दोघट क्षेत्रातील गढी कांगरान गावात तिच्या माहेरी राहायला गेली होती.
हे ही वाचा: इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे घाणेरडे चॅट्स! अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल... प्रकरण थेट पोलिसात
प्रियकराने पेट्रोल टाकून जाळलं
सन्नीचा भाऊ रविंद्रने दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी सन्नी कावड घेऊन दोघट क्षेत्रातून येत होता. त्या दिवशी आरोपी पत्नी अंकिता, तिची सासू, काका आणि तिचा प्रियकर अय्यूब यांनी त्याला जबरदस्ती वाटेतच थांबवलं आणि त्यांच्यासोबत सन्नीला घेऊन गेले. अंकिता आणि तिच्या कुटुंबियांनी सन्नीला पकडून ठेवलं आणि नंतर अय्यूबने पेट्रोल टाकून सर्वांसमोर त्याला जिवंत जाळलं असल्याचा सन्नीच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे.
सन्नीसोबत असं कृत्य केल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला. त्याचं जवळपास 80 टक्के शरीर जळलं असल्याचं सांगितलं गेलं. त्यावेळी सन्नीला तातडीने मेरठ आणि नंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान केवळ 5 दिवसांतच त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
हे ही वाचा: बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेला हादराच बसला! सीटजवळ बसलेल्या प्रवाशाने पँट काढून हस्तमैथुन सुरु केलं अन्..
पीडित तरुणाच्या कुटुंबियांचं धरणे आंदोलन
पीडित तरुणाच्या कुटुंबियांच्या मते, या घटनेनंतर 23 जुलै रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत प्रकरणातील कोणत्याच आरोपीला अटक करण्यात आली नाही. याच गोष्टीवर नाराजी व्यक्त करत पीडित तरुणाचे नातेवाईक मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि धरणे आंदोलन केलं. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान नंतर सीओने माइकवरुन कारवाईचं आश्वासन दिलं.
ADVERTISEMENT
