Viral Video : सध्या मान्सूनचे दिवस सुरू असून धबधब्याच्या ठिकाणी काही पर्यटक फिरायला येतात आणि पर्यावरणाचा मनमुरादपणे आनंद लुटतात. धबधब्यावर जाणं एका तरुणाच्या अंगलट आलं आहे. छत्तीसगडमधील एका धासगुड नावाच्या धबधब्यावर अचानकपणे एक मुलगा खाली कोसळला. दरम्यान, खाली उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडिओ रेकॉर्ड केला. या अपघातात मुलाला गंभीर दुखापती झाली असून तरुणाच्या शरीराची हाडे फ्रॅक्चर झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...
ही घटना सिरपूर रोडवरील बालोदा बाजार धासगुड धबधब्यावर घडली आहे. तीन मित्र पावसाळ्यात धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. दरम्यान, एक तरुण धबधब्यावर गेला होता असता, पाण्याचा प्रवाह वेगाने वाहू लागला होता. तेव्हा तो धबधब्याच्या दगडांवरती चढत होता. तेव्हा त्याचा पाय घसरल्याने त्याचा तोल गेला आणि तो जागीच पडला.
नेमकं काय घडलं?
तीन तरुण हे धासगुड या धबधब्याजवळ फिरायला आले होते. या दरम्यान तिघेही मौज मजा करू लागले होते. दरम्यान, निखिल साहू नावाचा एक तरुण धबधब्याच्या दगडांवर चढू लागला होता. त्याचवेळी तरुणाला पाय घसरल्याने त्याचा तोल सुटला आणि तो सुमारे 60-65 फूट खोल दरीत पडल्याची मन हेलावनारी घटना उघडकीस आली.
निखिल धबधब्यावरून खाली पडल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर निखिलला एका नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घडलेल्या घटनेनुसार, संबंधित पीडित तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्या शरीराची हाडे तुटली आहेत.
हेही वाचा : लोणावळ्यात तरुणीला जबरदस्ती कारमध्ये ओढलं, निर्जनस्थळी नेलं अन् वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर..हादरून टाकणारी घटना
दरम्यान, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र, याच ठिकाणी स्थानिक प्रशासन धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करते. तरीही काही पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी भेट देण्यास येतात. अनेकदा काही पर्यटकांना, तरुणांना उन्मादपणा नडतो आणि त्यांच्यासोबत अशी वाईट घटना घडते.
ADVERTISEMENT
