पहलगाम हल्ल्यातील 'त्या' 3 दहशतवाद्यांचा जंगलात केला खात्मा! 'ऑपरेशन महादेव'ची देशभरात होतेय चर्चा

Pahalgam Terrorist Attack Latest News :  जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना भारतीय सैन्याकडून कंठस्नान देण्यात आलं आहे.

Pahalgam Terrorist Attack Latest News

Pahalgam Terrorist Attack Latest News

मुंबई तक

• 03:56 PM • 28 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांना कंठस्नान

point

श्रीनगरच्या लिडवासमध्ये भारतीय सैन्याने राबवली मोहिम

point

पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा झाला होता मृत्यू

Pahalgam Terrorist Attack Latest News :  जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना भारतीय सैन्याकडून कंठस्नान देण्यात आलं आहे. ऑपरेशन महादेवच्या अंतर्गत सोमवारी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. श्रीनगरच्या लिडवासमध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून या दशहतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तसच त्यांच्याकडे असलेला अनेक दिवसांचा किराणाही जप्त केल्याचं सैनिकांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्यांना श्रीनगरमध्ये दोन दिवस आधीच संशयित कारवायांबाबत माहिती मिळाली होती. या संबंधीत स्थानिक लोकांनीही दहशतवाद्यांबाबत सैन्य दलाला माहिती दिली. त्यानंतर भारतीय सेनेकडून ऑपरेशन महादेव सुरु करण्यात आलं. हे ऑपरेशन श्रीनगरचं घनदाट जंगल दाचीगाव येथे सुरु झालं. 

घनदाट जंगलात सुरु केलं ऑपरेशन महादेव

दाचीगावमध्ये संशयित दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर अंदाज बांधण्यात आला की, या दहशतवाद्यांचं पहलगाममध्ये कनेक्शन असू शकतं. सैनिकांच्या अनेक तुकड्यांनी घनदाट जंगलात शोधमोहिम राबवली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सेनेची 24 आरआर आणि चार पीआरए टीमला तीन दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाली आणि त्यानंतर सैनिकांनी त्यांना ठार मारलं. 
भारतीय सैन्याने हे ऑपरेशन आधी सुरु केलं.

हे ही वाचा >> Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...

पण नंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफही या ऑपरेशनमध्ये सामील झाले. ज्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं, ते टीआरएफ दहशतवादी संघटनेशी जोडले गेले होते. यामध्ये खतरनाक दहशतवादी मुसाचाही समावेश आहे. ड्रोनच्या माध्यमातून तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह पाहण्यात आले. ड्रोन फोटोग्राफीच्या माध्यमातून याची पुष्टी करण्यात आली. आता मृतदेहाबाबत माहिती मिळवण्याचं काम सुरु आहे. याशिवाय दोन-तीन दहशतवादी जखमी झाल्याचंही समजते. 

मागील 14 दिवसांपासून भारतीय सैन्य लष्कर आणि ज्वाईंट ग्रुपला ट्रॅक करत होते. दहशतवाद्यांची संख्या पाच ते सात होऊ शकते. ऑपरेशन महादेव जबरवान आणि महादेव डोंगरात सुरु आहे. यामुळे याचं नाव ऑपरेशन महादेव ठेवण्यात आलं आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा >> ठाणे जिल्हा हादरला! आईनेच पोटच्या लेकरांच्या जेवणात मिसळलं विष, हादरून टाकणारी घटना

    follow whatsapp