नांदेड : फुल्ल दारु पिला, नादात अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, अन् सलमानने स्वत:ला पेटवलं; उपचारादरम्यान मृत्यू

Nanded Crime News : मृत तरुणाची ओळख शेख सलमान (वय 28) अशी करण्यात आली आहे. ही घटना नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील डॉक्टर लेन भागात मंगळवारी दुपारी घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सलमान हा दारूच्या नशेत डॉक्टर लेन परिसरात फिरत होता. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अचानक त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.

Nanded Crime News

Nanded Crime News

मुंबई तक

• 01:27 PM • 05 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड : फुल्ल दारु पिला, नादात अंगावर पेट्रोल ओतून घेतलं,

point

अन् सलमानने स्वत:ला पेटवलं; उपचारादरम्यान मृत्यू

Nanded Crime News , नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, जळत असलेल्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

मृत तरुणाची ओळख शेख सलमान (वय 28) अशी करण्यात आली आहे. ही घटना नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील डॉक्टर लेन भागात मंगळवारी दुपारी घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सलमान हा दारूच्या नशेत डॉक्टर लेन परिसरात फिरत होता. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अचानक त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.

आग लागल्यानंतर तो तरुण वेदनेने ओरडत रस्त्यावर धावू लागला आणि मदतीसाठी आक्रोश करू लागला. परिसरातील नागरिकांनी ही घटना पाहताच तातडीने धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली, तर काहींनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा : 12 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग! नेहमीच्या त्रासाला कंटाळून शाळा सोडली, पण शेवटी वाटेत अडवून भयंकर कृत्य

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या शेख सलमानला त्वरित नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान सुमारे 90 टक्के भाजला होता. त्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असले, तरी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जळत असलेला तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिक लोक प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्रशासनाने नागरिकांना असे व्हिडीओ शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेख सलमान दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिस मृताच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेत असून, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुणांमधील व्यसनाधीनता आणि मानसिक तणाव याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईत 20 वर्षीय अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार, 5 महिन्यांची गर्भवती राहिली अन् DNA रिपोट्सनंतर बापाला अटक
 

    follow whatsapp