Maharashtra Weather : राज्यात वारं फिरलं, ऊन, वारा अन् पाऊस संगटच, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ होऊ लागलेली आहे, मात्र सध्या दुहेरी स्वरुपाचं वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता जारी करण्यात आली आहे. काही भागांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra weather

Maharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 18 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात स्वरुपाचं वातावरण

point

काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ होऊ लागलेली आहे, मात्र सध्या दुहेरी स्वरुपाचं वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता जारी करण्यात आली आहे. काही भागांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उष्णतेची परिस्थिती अनुभवयला मिळत आहे. अशातच जाणून घेऊयात 18 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड हादरलं! परळी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन, काही दिवसांत बांधणार होता लग्नगाठ

कोकण 

कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता जारी करण्यात आली. उर्वरित कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची दाट शक्यता आहे. या विभागात वातावरणाचं दुहेरी संकट जारी करण्यात आलं. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्र विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हवामान विभागाने ढगाळ वातावरणाचा अलर्ट जारी केला. पुणे, सोलापूर आणि परिसरात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते, या विभागाला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा

मराठवाडा विभागातील बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता जारी केली. तसेच विभागातील धाराशिव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत हवामान विभागाने उष्णतेचा अलर्ट जारी केला. 

हे ही वाचा : मोठी बातमी! अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

विदर्भ 

विदर्भ विभागातील नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. काही भागांत कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र या ठिकाणीही हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे.