Govt Jobs : पदवीधरांसाठी LIC मध्ये नोकरीची संधी, मिळणार 40 हजार पगार, 'असा' करा अर्ज

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंट या पदांसाठी भरती सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत आहे. पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची ही एक उत्तम संधी आहे.

Government Job

Government Job

मुंबई तक

• 11:33 AM • 17 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांसाठी LIC मध्ये नोकरीची संधी

point

मिळणार 40 हजार पगार

point

अर्ज कसा कराल?

Govt Jobs : पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आली आहे. LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंटच्या 180 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. बँकिंग आणि वित्त क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना देशभरातील विविध शाखांमध्ये नियुक्त केले जाणार आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार, अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, आजच्या डिजिटल युगाची गरज ओळखून उमेदवाराला कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि दैनंदिन कामकाजाचे तांत्रिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता आणि तांत्रिक कौशल्य यांचा योग्य मेळ असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे.

हे ही वाचा : Personal Finance: Term insurance खरेदी करताना करू नका 'या' 6 चुका, नाहीतर...

'असा' करा अर्ज

वयोमर्यादेचा विचार करता, 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने (www.lichousing.com) अर्ज सादर करावा लागणार असून, त्यासाठी 944 रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्जामध्ये दिलेली माहिती अधिकृत कागदपत्रांशी जुळणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज बाद ठरवला जाऊ शकतो.

हे ही वाचा : बुध करणार मेष राशीत प्रवेश, 'या' राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा, तुमच्या राशीत काय?

'इतका' पगार मिळणार

अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत आहे. परीक्षा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात होईल असे सांगण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या भरतीमुळे वित्त क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाला मोठी चालना मिळणार असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे फायदेशीर ठरेल.