Govt Job: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बऱ्याच विभागात शैक्षणिक पात्रतेसह उमेदवारांचा अनुभव देखील विचारात घेतला जातो. अशातच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने फ्रेशर्स तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. 'इंडियन ऑइन कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून पाइपलाइन विभागात अप्रेन्टिसशिप पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीअंतर्गत, देशांतर्गत वेगवेगळ्या विभागात अप्रेन्टिसशिपच्या एकूण 394 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT
IOCL ची ही भरती पाइपलाइन डिव्हीजनमध्ये केली जाणार असून यामध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अशा दोन्ही विभागातील अप्रेन्टिस पदांचा समावेश आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना निश्चित काळासाठी अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग दिली जाईल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
'इंडियन ऑइल'च्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी 12 वी पास उत्तीर्ण असण्यासोबत त्यांच्याकडे ITI सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसेच, काही पदांसाठी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी असणं आवश्यक आहे. या भरतीसाठी, पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोटिफिकेशन तपासू शकतात.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: आधी तिन्ही मुलांना फासावर लटकवलं आणि नंतर आईने प्यायलं डीझेल... नेमकं काय घडलं?
कसा कराल अर्ज?
1. उमेदवारांनी IOCL अप्रेंटिसशिपसाठी apprenticeshipindia.gov.in किंवा nats.education.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करा.
2. त्यानंतर, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरून लॉगिन डिटेल्स तयार करा.
3. आता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून पोर्टल प्रविष्ट करा.
4. लॉग इन केल्यानंतर, फॉर्म भरण्यासाठी 'Apply Online'पर्याय निवडून अर्ज भरा.
5. आता फोटो आणि सही तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6. शेवटी, अर्जाचं शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
ADVERTISEMENT











