बीड हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवून 9 वर्षीय चिमुकलीवर 70 वर्षीय वृद्धाकडून लैंगिक अत्याचार, घटनेनं परिसर हादरला

Beed crime : बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड येथे माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इयत्ता चौथीत शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षाच्या चिमुकलीवर 70 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 28 जानेवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे. नराधमाने चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर हैवानी कृत्य केलं.

Beed crime

Beed crime

मुंबई तक

02 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 08:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेला चॉकलेटचं आमिष देऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार 

point

आंबेजोगाई येथून फरार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं

Beed Crime : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड येथे माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इयत्ता चौथीत शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षाच्या चिमुकलीवर 70 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 28 जानेवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे. नराधमाने चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर हैवानी कृत्य केलं. पीडितेच्या आईने नराधमाविरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दिंद्रुड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तो काळा आहे, शारीरिक संबंधातून मला संतुष्ट..' एका महिन्यातच बायकोने नवऱ्याला सोडून दिलं

पीडितेला चॉकलेटचं आमिष देऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार 

घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, धारून तालुक्यातील एका गावात शेतमजूर काम करणारे कुटुंब राहते, त्यांचीच मुलगी इयत्ता चौथीत शिक्षण घेते. 28 जानेवारी रोजी सकाळी ती शाळेत जाताना आपल्या मैत्रिणीकडे गेली असता, रस्त्यात एक आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेटचं आमिष देऊन घरात नेलं. नंतर त्याने घराची कडी लावून चिमुकलीच्या अंगावरील सर्व कापडे काढून तिच्यावर अत्याचार केला. या  घटनेनं पीडित मुलगी भयभीत झाली, घटनास्थळावरून तिने शाळेत पळ काढला. 

या प्रकरणात दिंद्रुड पोलिसांना घटनेची सर्व माहिती सांगितली होती. नराधमाने बाबुराव केरबा निरडेविरुद्ध दिंद्रुड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती फिर्यादीच्या आईने दिली. 

हे ही वाचा : अजितदादांच्या अंत्यसंस्कारादरम्यान 20 लाख रुपयांचे दागिने चोरीला, बारामती पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत आंबेजोगाई येथून फरार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. केज पोलीस ठाण्यात दाखल करत आरोपी बाबुराव निरडेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती सपोनी महादेव ठाकणे यांनी दिली होती.