अजितदादांच्या अंत्यसंस्कारादरम्यान 20 लाख रुपयांचे दागिने चोरीला, बारामती पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Ajit pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. त्यांच्याच अंत्यविधीसाठी जनसमुदाय लोटला होता. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र होतं. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 20 लाख रुपयांच्या सोन्याची चोरी केली.

Ajit pawar

Ajit pawar

मुंबई तक

02 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 07:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

 बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीत 20 लाखांचे सोने चोरीला 

point

आरोपींची नावे आली समोर 

Ajit pawar funreal And Gold theft : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर 29 जानेवारी रोजी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये राज्यातील अनेक राजकीय नेत्यांसह सर्व जनसमुदाय लोटला होता. याच गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तब्बल 20.50 लाख सोन्यांची चोरी करण्यात आल्याचं वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  'आयुष्यभर तुमच्यासोबत..', विदीप जाधवांच्या पत्नीचं सांत्वन करताना सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? VIDEO

बारामतीत अजितदादांच्या अंत्यविधीत 20 लाखांचे सोने चोरीला 

तक्रारदारांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रणजित बाळासाहेब जाधव यांच्यासह विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलाश भागवत, रणजित मधुकर भोसले आणि इतरांचे मिळून सुमारे 20 लाख रुपये सोन्याच्या साखळ्या, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.  

हे ही वाचा :  इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म, वसतिगृहात उडाला गोंधळ

आरोपींची नावे आली समोर 

या प्रकरणी तपासादरम्यान, आरोपी राजकुमार बाबुराव आठवले, मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस, मोहम्मद सादिक मोहम्मद गफारस, मोहम्मद सादिक, दत्तात्रय बबन धोत्रे, नितीन अंकुश गायकवाड यांना अटक करण्यात आली. चोरांनी चोरलेले सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यासाठी आरोपींची कसून चौकशी सुरु केली जात आहे. 

    follow whatsapp