नागपूर: M.D Medicine डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं, 'त्या' कारणाने तरुणाने पंख्य़ाला गळफास घेत संपवलं जीवन

Nagpur News : नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेत्ररोग विभागातील एका डॉक्टरने गळफास घेत जीवन संपवलं. नुकताच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याने प्रवेश घेतला होता. या घटनेनं रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या आत्महत्येचं कारण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

nagpur news

nagpur news

मुंबई तक

03 Feb 2026 (अपडेटेड: 03 Feb 2026, 11:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऋत्विकने पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन

point

आत्महत्येचं ठोस कारण काय?

Nagpur News : नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेत्ररोग विभागातील एका डॉक्टरने गळफास घेत जीवन संपवलं. नुकताच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याने प्रवेश घेतला होता. या घटनेनं रुग्णालयात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव ऋत्विक सागर ठाकूर (वय 26) असे आहे. त्यांनी मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल आणि के. ई.एम. रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. नंतर पुढचे शिक्षण करण्यासाठी त्याला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तरच्या शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत उडी मारत तरुणीनं संपवलं जीवन, कारण आलं समोर

आपलं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी 26 जानेवारी रोजी त्याने नागपूर गाठलं. मेडिकल हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी खोली मिळण्यास त्याला विलंब लागला, त्याने गणेशपेठ येथे हॉटेल अर्जुनमध्ये एक खोली घेतली होती. तसेच त्याने नेत्ररोग विभागाच्या रुग्णांना सेवा देखील देण्यास सुरुवात केली होती.  

ऋत्विकने पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन

सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी त्याने बाह्यरुग्णालयात आला नव्हता. विभागप्रमुख डॉ. दिलीप कुमारे यांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांशी संपर्क साधून दिली होती. ऋत्विक हा गणेशपेठ येथील हॉटेलमध्ये राहत असल्याने त्याच ठिकाणी एका तरुणाला पाठवण्यात आले, त्याच खोलीतून कोणीच प्रतिसाद दिला नव्हता. आत ऋत्विकने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं होतं. 

नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप कुमरे आत्महत्येचं कारण सांगितलं

एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विकला एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश घ्यायचा होता, मात्र त्या विषयात जागा उपलब्ध नसल्याने त्याला नेत्ररोग विषयात प्रवेश घ्यावा लागल्याने त्यांनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप कुमरे यांनी सांगितलं. 

हे ही वाचा : मुलीने रॅपिडो बुक केली; रस्त्यात चालकाने केला बलात्कार, नेमकं काय घडलं?

नंतर या घटनेची माहिती आई वडिलांना देण्यात आली होती. सर्वांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला. नंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

    follow whatsapp