Lonavala Suicide : मुंबईत एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने लोणावळ्यातील टाइगर पॉइंट येथे 400 फूट खोल दरीत उडी मारत आपलं जवन संपवलं. श्रेया नरेंद्र पाटील (वय 20) असे तरुणीचे नाव आहे. प्राथमिक तपासातून समोर आले की, तिने कौटुंबिक वादातूनच असं टोकाचं पाऊल उचललं आहे. ड्रोनच्या मदतीने 36 तासांच्या शोधानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. या प्रकरणात लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर खोल दरीतून मृतेदह बाहेर काढण्याचे काम केलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात वारं फिरलं, पुढील काही तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून अलर्ट
घडलेल्या घटनेनुसार, श्रेया ही 31 जानेवारी रोजी ट्रेकिंगला जात असल्याचं सांगून घरातून निघाली होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास की लोणावळ्यात पोहोचली. ती प्रथम ड्यूक्स नोजवर गेली, नंतर खाली उतरली आणि टायगर पॉइंटला रिक्षा केली. तिने आपली बॅग एका स्टॉल मागे सोडून दिली होती.
टायगर पॉइंटच्या 400 फूट खोल दरीत उडी मारत संपवलं जीवन
संबंधित प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली, श्रेयाने टायगर पॉइंटवरील रेलिंगजवळील तुटलेल्या तारांचे कुंपण ओलांडून थेट 400 फूट खोल दरीत उडी मारली. श्रेया सायंकाळपर्यंत घरी परतली नाही, तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन बंद लागला.
हे ही वाचा : बहिणीच्या प्रेम प्रकरणाला आई-वडिलांचा पाठिंबा; संतापलेल्या भावाने तिघांना संपवलं; मृतदेह भाड्याच्या घरात पुरला
बॅगमधील कपड्यांवरून श्वान पथकाने पोलिलांना श्रेयाने ज्या ठिकाणी उडी मारली होती त्या ठिकाणी नेले. टायगर पॉइंट परिसर खोल आणि दुर्गम असल्याने शोध घेणं कठीण होत आहे. दुसऱ्या दिवशी ड्रोनच्या मदतीने शोध पुन्हा सुरु करण्यात आला. लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने देखील शोध घेतला. या घटनेच्या काही तासानंतर म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अधिक काळ सुरु असलेल्या शोध मोहिमेनंतर श्रेयाचा मृतदेह एका खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT











