Maharashtra Weather : राज्यात वारं फिरलं, पुढील काही तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 03 Feb 2026

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसतो. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडीत घट झाल्याचे चित्र आहे. तर राज्याच्या काही जिल्ह्यांत पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली. जाणून घेऊयात 3 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसतो.

point

3 जानेवारी2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसतो. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडीत घट झाल्याचे चित्र आहे. तर राज्याच्या काही जिल्ह्यांत पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली. अशातच 3 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अजितदादांसोबत OSD का नव्हता? दादांची ओळख बनलेलं घड्याळ कुठं गेलं? मला घातपाताची शंका; मिटकरींचे 7 मोठे प्रश्न

कोकण :  

कोकण विभागात हवामान मुख्यत्वे कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे या उत्तर कोकण जिल्ह्यांत काहीअंशी प्रमाणात जिल्ह्यात काहीसे ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. सकाळी हलके धुके राहील. 

पश्चिम महाराष्ट्र :

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हवामान मुख्यत: कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. सकाळी थंडी जाणवेल, तसेच काही ठिकाणी तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस राहील. 

विदर्भ :  

विदर्भात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहेत. सकाळी थंड जाणवण्याची शक्यता आहे. तर दुपारी उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुख्यत्वे कोरडं राहील. 

हे ही वाचा : बीड हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवून 9 वर्षीय चिमुकलीवर 70 वर्षीय वृद्धाकडून लैंगिक अत्याचार, घटनेनं परिसर हादरला

मराठवाडा : 

राज्यात एकंदरीत थंडावा कमी होऊन काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात उकाडा राहील. मराठवाड्यात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.