Govt Job: भारताच्या तपास यंत्रणेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टंट सब-इंस्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार nia.gov.in संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
इंस्पेक्टर: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी जे नियमितपणे समान पदांवर कार्यरत असलेले किंवा बेसिक कॅडर पे मॅट्रिक्स लेव्हल-06 (35,400 ते 1,12,400 रुपये) पदांवर 5 वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेले उमेदवार इंस्पेक्टर पदांसाठी अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असण्यासोबत गुन्हेगारी प्रकरणांचा तपास, गुप्तचर कार्य किंवा ऑपरेशन्स, माहिती तंत्रज्ञान किंवा दहशतवादविरोधी प्रशिक्षण किंवा दक्षता संकलन या क्षेत्रात दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सब इंस्पेक्टर: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी केंद्र किंवा केंद्रशासित प्रदेशात लेव्हल-5 पे बँडमध्ये नियमित आधारावर अधिकाऱ्याची 6 वर्षे सेवा असणं गरजेचं आहे. तसेच, बॅचलर्स डिग्री आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपास किंवा गुप्तचर काम, ऑपरेशन्स इत्यादींमध्ये 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
असिस्टंट सब इंस्पेक्टर: संबंधित पदावर नियुक्त होण्यासाठी कोणत्याही राज्य किंवा केंद्रीय पोलिस संघटनेत हेड कॉन्स्टेबल लेव्हल-04 या पदावर 5 वर्षांचा नियमित सेवेचा अनुभव असणं अनिवार्य आहे. यासोबतच, ग्रॅज्युएशन आणि फौजदारी खटल्यांचा तपास, गुप्तचर कार्य ऑपरेशनमध्ये 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
हेड कॉन्स्टेबल: केंद्र किंवा राज्य पोलीस संघटनेत रेग्युलर बेसवर काम करणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच, उमेदवारांसाठी 56 वर्षे उच्चवयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा: मुंबईत 20 वर्षीय अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार, 5 महिन्यांची गर्भवती राहिली अन् DNA रिपोट्सनंतर बापाला अटक
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आधी अधिकृत नोटिफिकेशनमधून बायोडेटा करिक्युलम डाउनलोड करा.
2. यामध्ये, अप्लाइड पोस्ट, नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव, मूळ वेतन, ग्रेड पे इत्यादी सर्व माहिती भरा.
3. त्याखाली एम्प्लॉयर/ कॅडर कंट्रोलिंग ऑथरिटीसारखी महत्त्वाची माहिती भरा.
4. आता, हे स्पीड पोस्टच्या माध्यमातून NIA ला पाठवा.
5. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी असून यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
भरतीसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार एनआईएच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT











