Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 04 Feb 2026

Maharashtra Weather : राज्यातील हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील. तसेच वातावरणात फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

maharashtra weather

maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानाचा अंदाज

point

काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी...?

Maharashtra Weather : राज्यातील हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील. तसेच वातावरणात फार मोठा बदल होईल अशी शक्यता नाही, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. अशातच राज्यातील एकूण हवामान विभागाची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहेत.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत उडी मारत तरुणीनं संपवलं जीवन, कारण आलं समोर

कोकण : 

कोकणात काही ठिकाणी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. यामुळे वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई शक्यता 32 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याच विभागातील पुणे या मुख्य शहरात आकाश स्वच्छ राहणार असून दुपारनंतर आभाळ भरून येईल, पण पावसाचा अंदाज नसेल.  

मराठवाडा : 

मराठवाडा विभागात काही ठिकाणी हलक्या ढगांची शक्यता आहे. तसेच तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कोरडे हवामान, अलगद अलग ठिकाणी हलक्या ढगांची शक्यता. 

हे ही वाचा : नागपूर: M.D Medicine डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं, 'त्या' कारणाने तरुणाने पंख्य़ाला गळफास घेत संपवलं जीवन

विदर्भ : 

विदर्भात कोरडे हवामान, पावसाची शक्यता नाही. आकाश निरभ्र राहील. किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता.