बीड: उसन्या पैशांच्या वादातून मित्राचाच काढला काटा; अवघ्या 24 तासांत प्रकरणाचा छडा...

बीडमध्ये एका तरुणाने पैशांच्या वादातून आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अवघ्या 24 तासांच्या आत या खुनाचा छडा लावून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:32 PM • 03 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

उसन्या पैशांच्या वादातून मित्राचाच काढला काटा

point

अवघ्या 24 तासांत प्रकरणाचा छडा...

point

बीडमधील धक्कादायक घटना

बीड- रोहिदास हातागळे: बीडमध्ये एका तरुणाने पैशांच्या वादातून आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या घटनेतील आरोपीला जेरबंद करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आलं असून अवघ्या 24 तासांच्या आत या खुनाचा छडा लावून पोलिसांनी आरोपी अतिक गुलाब तांबोळी याला अटक केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह 

पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीतील दगडवाडी गावच्या शिवारात, बीड ते शिरूर रोडवर दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. व्यवसायाने पेंटर असलेला चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय 30, रा. रायमोहा, ता. शिरूर) याचा एका अज्ञात इसमाने डोक्यात दगड मारून खून केला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि पाटोदा पोलीस ठाण्यात खुनाचा (BNS कलम 103) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचं तपासाचं चक्र 

अज्ञात आरोपीविरुद्ध कोणतेही पुरावे नसताना हा गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होतं. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासासाठी विशेष पथक तैनात केलं. गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. तपासादरम्यान संशयाची सुई अतिक गुलाब तांबोळी (रा. ईस्लामपुरा पेठ, बीड) याच्याकडे वळली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बीडच्या शासकीय रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतलं.

हे ही वाचा: नांदेड हादरलं! सत्तेच्या खुर्चीसाठी पोटच्या मुलीचा काढला काटा; 6 वर्षांच्या चिमुकलीला तेलंगणाला नेलं अन्...

सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांच्या कठोर चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी अतिकने मृत चाँद तांबोळी याच्याकडून काही पैसे हातउसणे घेतले होते. चाँद हा वारंवार आपल्या पैशांची मागणी करत तगादा लावत होता. याच वादातून संतापलेल्या अतिकने चाँदचा काटा काढण्याचं ठरवलं आणि दगडवाडी शिवारात डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. 

ही कारवाई पोउपनि सुशांत सुतळे, श्रीराम खटावकर, अंमलदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, राहुल शिंदे, मारुती कांबळे, युनूस बागवान, अशफाक, परझणे, शेख आणि चालक हराळे यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील तपासासाठी पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    follow whatsapp