India Post Recruitment 2026: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवायची असेल तर टपाल विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'इंडिया पोस्ट'कडून 10 वी पास उमेदवारांसाठी 28,000 हून अधिक जीडीएस (GDS) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून देशभरातील 23 मंडळांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) आणि शाखा पोस्ट मास्टर (BPM) या पदांवर भरती केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता
इंडिया पोस्टच्या या भरतीसाठी 31 जानेवारी रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 14 फेब्रुवारी पर्यंत राहील आणि 16 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवकाच्या या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यामुळे, फॉर्म भरण्यासाठी 10 वीची मार्कशीट आवश्यक असेल. टपाल विभागाने त्यांच्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये या कागदपत्रांची माहिती देखील दिली आहे.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
हे ही वाचा: पुणे: मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद... जिवलग मित्रावरच कोयत्याने प्राणघातक हल्ला, CCTV फुटेज समोर
उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर, त्यांच्या दहावीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट तयार केली जाणार असून या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. उमेदवारांच्या 10 वीच्या गुणांवर आधारित त्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम नियुक्ती केली जाणार आहे.
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम indiapostgdsonline.gov.in या इंडियन पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर, होमपेजवरील भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
3. आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्जात आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक डॉक्यमेंट्स अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
ADVERTISEMENT











