Petrol diesel price hike : आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सर्वसामान्यांना दणका देणाऱ्या बातमीने झाली आहे.. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी चौथ्यांदा इंधनाचे दर वाढवून सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. चार वर्षांपासून किमती स्थिर ठेवल्यानंतर, 15 मे रोजी अचानक इंधनाचे दर वाढवण्यात आले होते आणि तेव्हापासून सुरू झालेली हा दरवाढीची मालिका अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत चार वेळा केलेल्या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 7 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या; राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूला कुणी संपवले?
एकाच झटक्यात मोठी दरवाढ
सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत 2.61 रुपये आणि डिझेलच्या किमतीत 2.71 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रति लिटर 95.20 रुपये आणि पेट्रोलची किंमत 102.12 रुपये प्रति लिटर झाली आहे. गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी एकदम मोठी दरवाढ करण्याऐवजी 2022 मधील मार्च-एप्रिल महिन्याप्रमाणेच टप्प्याटप्प्याने दर वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. 15 मे रोजी 3 रुपये, त्यानंतर 19 मे रोजी 90 पैसे आणि 23 मे रोजी पुन्हा पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महाग झाले होते. आता सोमवार, 25 मे रोजी इंधनाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांहून अधिक वाढ करून चौथा मोठा झटका देण्यात आला आहे.
हेही वाचा : काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले, कारण वाचून हादरुन जाल
देशभरातील विविध शहरांमधील इंधनाचे दर
दरवाढीनंतर आता दिल्लीत पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेली आहे. केवळ दिल्लीच नाही, तर इतर प्रमुख शहरांमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. कोलकातामध्ये आता पेट्रोल 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.21 रुपये तर डिझेलचा दर 97.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. तसेच चेन्नईमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 107.77 रुपये आणि डिझेलसाठी 99.55 रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढून दैनंदिन जीवनावरील महागाईचा दबाव अधिकच वाढत आहे.
2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात कच्चे तेल उच्चांकी पातळीवर असताना तेल कंपन्यांनी सलग 13 दिवस दर वाढवले होते. त्या काळी इंडियन ऑईलने 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 10 रुपयांनी वाढवले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, सध्याच्या दरवाढीची तुलना 2022 च्या स्थितीशी नसल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. या महागाईच्या झळा संपूर्ण देशाला सोसाव्या लागत आहेत, ज्याची सुरुवात सोमवारी झालेल्या दरवाढीने झाली आहे.
ADVERTISEMENT











