बीड : 12 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तलाठ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

26 May 2026 (अपडेटेड: 26 May 2026, 03:58 PM)

Beed Crime News : अवघ्या 12 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या एका तलाठ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..

Beed Crime News

Beed Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड : बारा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तलाठ्याची आत्महत्या

point

अंबाजोगाईमध्ये नेमकं काय घडलं?

रोहिदास हातागळे | बीड : बारा दिवसापूर्वी विवाहबद्ध झालेल्या  आणि व्यवसायाने तलाठी असलेल्या गणेश दत्तू कोळी यांनी आज (दि.26) आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ते अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या मोरेवाडी परिसरात ज्योतीराम दळवे यांच्या घरातील रुममध्ये राहात होते. त्याच रुममध्ये त्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Astrology : मंगळ ग्रहाचा काही राशीतील लोकांवर प्रभाव, आर्थिक आणि करिअरबाबत चांगले संकेत

लग्नाला केवळ 12 दिवस झालेले असताना केली आत्महत्या 

अधिकची माहिती अशी की, गणेश कोळी हे मूळ औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील रहिवासी होते. मात्र सद्यस्थितीमध्ये ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत होते. त्यांचा विवाह अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या फॉरेन्सिक डिपारमेंटमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या दिपाली हिच्या सोबत झाला होता. विशेष म्हणजे हा विवाह केवळ 12 दिवसांपूर्वी म्हणजे 13 मे 2026 रोजी बीड येथे झाला होता.

हेही वाचा : रात्री सगळे गाढ झोपले, सकाळी चिमुकलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग; कुणी केले अत्याचार?

भाड्याने राहत असताना त्याच रुममध्ये संपवलं जीवन 

गणेश व दिपाली कोळी यांनी राहण्यासाठी अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या मोरेवाडी परिसरातील रहिवाशी ज्योतीराम दळवे यांच्याकडे रूम भाड्याने घेतली होती. दिपाली व गणेश यांच्या विवाहास केवळ 12 दिवस लोटले असताना या 12 दिवसात असं काय घडलं की त्यांच्या नव्याने फुलू लागलेल्या संसारास दृष्ट लागली. गणेश यांनी आज (दि.26) सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पत्नी ड्युटीवर गेलेली असताना गळफास घेतला. रूममध्ये कोणीही नसताना गणेश कोळी यांनी स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकला दोर लावून  गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसून उद्या शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल होईल असा अंदाज असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.