पालघरमध्ये पुराचे पाणी घरात शिरले, छतावर चार तास मृतदेहासोबत कुटुंब

मुंबई तक

• 06:02 PM • 11 Jul 2026

Palghar Flood In Death Body : पालघरसह राज्यात 6 जुलै 2025 रोजी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. जिल्ह्यातील केवळे स्थानाकाच्या पूर्वेकडील देवीपाड्यात पावसाने हाहाकार माजवला. याच पुरात एका कुटुंबावर असा प्रसंग ओढावला की ज्याने प्रत्येकाचे मन हेलावून निघाले आहे. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत असताना घरात पावसाचे पाणी शिरले आणि अंत्यसंस्कारासाठी तब्बल चार तासांचा विलंब लागला.

Palghar Flood In Death Body

Palghar Flood In Death Body

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणला

point

मृतदेह खाटेवर आणि पाण्याच्या पातळीत वाढ

point

चार तास मृतदेह घराच्या छतावर

Palghar Flood In Death Body : मोहम्मद हुसैन खान - पालघरसह राज्यात 6 जुलै 2025 रोजी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. जिल्ह्यातील केवळे स्थानाकाच्या पूर्वेकडील देवीपाड्यात पावसाने हाहाकार माजवला. याच मुसळधार पावसाने पूर आल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. याच पुरात एका कुटुंबावर असा प्रसंग ओढावला की ज्याने प्रत्येकाचे मन हेलावून निघाले आहे. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत असताना घरात पावसाचे पाणी शिरले आणि अंत्यसंस्कारासाठी तब्बल चार तासांचा विलंब लागला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांवर काळाचा घाला, 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणला

अनुसया मनोहर लिलका यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आला होता. मात्र रेल्वे अंडरपासमध्ये पाणी साचल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन घरापर्यंत आणावा लागला होता. घरात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि अचानकपणे घरात पूराचे पाणी शिरले. 

मृतदेह खाटेवर आणि पाण्याच्या पातळीत वाढ

मृतदेह घरातील खाटेवर ठेवण्यात आला होता, मात्र काहीच क्षणातच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली होती. संपूर्ण घराला पाण्याने वेढा घातला होता. अशा स्थितीत कुटुंबियांना जीव वाचवण्यासाठी आणि संबंधित मृतदेहावर अंत्यसंस्कारही करायचे होते. 

चिमुकलीसह कुटुंबीय तब्बल चार तास मृतदेहासोबत घराच्या छतावर

नाईलाजाने कुटुंबियांनी घरांच्या स्वयंपाकघरावरील सिमेंटचे पत्रे फोडले. मोठ्या कष्टाने मृतदेह छतावर नेण्यात आला. पावसापासून बचावासाठी मृतदेहावर प्लास्टिक टाकण्यात आले होते. एका चिमुकलीसह कुटुंबीय तब्बल चार तास मृतदेहासोबत घराच्या छतावर बसून राहिले होते. 

हे ही वाचा : मुंबई: टिव्ही अभिनेत्याला अटक, 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप

तब्बल चार तासांनंतर पुराचे पाणी ओसलून लागल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली आणण्यात आला होता. देवीपाडा स्मशानभूमीत अनुसया मनोहर लिलका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना केवळ पुरासंबंधित नसून एका कुटुंबावर आलेल्या एका वाईट प्रसंगाबाबत आहे.