जळगाव: वारकरी शिक्षण संस्थेतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मुंबई तक

09 Oct 2026 (अपडेटेड: 09 Oct 2026, 06:00 PM)

Jalgaon News : जळगावच्या सावरखेडा शिवारातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारकरी शिक्षण संस्थेतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना आहे.

Jalgaon News

Jalgaon News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मोटारचा करंट लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू 

point

मृत मुलाचा मामा आणि व्यवस्थापकाने घटनेची दिली माहिती

Jalgaon News : मनीष जोग - जळगाव शहरातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहराजवळील असलेल्या सावरखेडा शिवारातील राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात आज 9 ऑक्टोबर रोजी सकाळी विजेचा धक्का लागून चिन्मय मंगेश सपकाळे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. बोरिंगची इलेक्ट्रिक पिन जोडताना विजेचा जोराचा धक्का बसला होता. सहकाऱ्यांनी त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची मृत मुलाच्या मामाने आणि व्यवस्थापकाने माध्यमाशी बोलताना माहिती दिली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : दुहेरी हत्याकांड! होमगार्डने पत्नी आणि मुलीची डेटा केबलनं गळा आवळून केली हत्या

मोटारचा करंट लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू 

या घडलेल्या घटनेत मामाने सांगितलं की, चिन्मय मंगेळ सपकाळे (वय 14) हा माझा भाचा आहे. आम्ही वारकरी संप्रदायाच्या आश्रामशाळेत दाखल केले होते. त्याच्या आईचे वर्षभरापूर्वी कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्याच आश्रमशाळेतून फोन आला की, पाण्याच्या मोटारचा करंट लागून तो जखमी झाल्याची माहिती आम्हाला देण्यात आली आणि त्याला सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले होते. माझी फक्त मागणी आहे की, जिथे ही घटना घडली ती पुन्हा घडू नये म्हणून त्यांनी उपाययोजना करावी, असे मृत चिन्मय सपकाळ यांचे मामा सुनिल कोळी म्हणाले.  

हे ही वाचा : पत्नीने दारूड्या नवऱ्याला संपवलं, गुन्ह्यात पोटच्या लेकरांचा समावेश

व्यवस्थापकांनी दिली माहिती 

दरम्यान, या घटनेबाबत आश्रमशाळेच्या व्यवस्थापकांनी देखील माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही घटना सकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान घडली होती. राधेकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आहे. माझ्याकडे अठरा मुले आहेत. काहींना आई नाहीये, तर काहींना वडील नाहीयेत तर काहींना दोघेही नाहीत, त्यांचा मी मोफत सांभाळ करतो. तो माझ्याकडे गेली पाच महिन्यांपासून आश्रमशाळेत राहत होता, अशी माहिती व्यवस्थापक गोपाळ महाराज यांनी दिली.