मुंबईची खबर : 'आमचे प्रयत्न अपुरे पडले' बीएमसीच्या विशेष सर्वसाधारण सभेत काय घडलं?

मुंबई तक

• 03:00 PM • 12 Jul 2026

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या आपत्कालीन उपाययोजनांमध्ये त्रुटी राहिल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : 'आमचे प्रयत्न अपुरे पडले'

point

बीएमसीच्या विशेष सर्वसाधारण सभेत काय घडलं?

Mumbai News : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. महापालिकेच्या पावसाळ्यातील तयारीवर जोरदार टीका झाली. या पावसामुळे आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या आपत्कालीन उपाययोजनांमध्ये त्रुटी राहिल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे. 12 तास चाललेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही कबुली देण्यात आली. 

हे वाचलं का?

'आमचे प्रयत्न अपुरे पडले'

या दीर्घ चर्चेच्या शेवटी, महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला नगरसेवकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे निर्देश दिले. यावर उत्तर देताना पश्चिम उपनगराचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी पालिकेच्या त्रुटी मान्य केल्या. "आमचे प्रयत्न अपुरे पडले, हे मान्य करायला आम्हाला कोणतीही अडचण नाही. झालेल्या चुकांमधून शिकून आगामी काळात यामध्ये नक्कीच सुधारणा केली जाईल," अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली.

हे ही वाचा : बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल

अतिरिक्त आयुक्तांनी काय सांगितले?

या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान एकूण 44 नगरसेवकांनी भाग घेतला आणि मुंबईकरांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासावर संताप व्यक्त केला. यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच, गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या झाडं कोसळण्याच्या आणि झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त करत, प्रशासनाकडून त्या रोखण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांचा सविस्तर तपशील त्यांनी सभागृहासमोर मांडला.

हे ही वाचा : 15,00,00,000 बाजूला काढले, लाडकी बहिणवरुन सरकार अडचणीत, CAG च्या अहवालात काय?

वृक्षारोपण केले जाणार

सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ज्या झाडांचे नुकसान झाले आहे, त्या बदल्यात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर नुकसानभरपाई म्हणून वृक्षारोपण केले जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. याशिवाय, वृक्ष प्राधिकरणाकडून (ट्री ऑथॉरिटी) एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात येत आहे. ही समिती पावसाळ्यात झाडांचे संवर्धन करणे, फांद्यांची योग्य शास्त्रीय पद्धतीने छाटणी करणे आणि त्यांच्या देखभालीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे, जेणेकरून भविष्यातील दुर्घटना टाळता येतील.