Govt Jobs : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरु, एक लाखाहून अधिक पगार, लगेच करा अर्ज

मुंबई तक

• 07:01 PM • 10 Jul 2026

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. बीएससी, एमबीए, बीकॉम उत्तीर्णांना ही उत्तम संधी आहे.

Cotton Corporation Recruitment

Cotton Corporation Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरु

point

एक लाखाहून अधिक पगार

point

लगेच करा अर्ज

Cotton Corporation Recruitment : भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 148 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव आणि ज्युनियर असिस्टंट यांसारख्या विविध पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. संपूर्ण भारतात या पदांसाठी नोकरीचे ठिकाण असणार आहे. देशातील एका प्रतिष्ठित सरकारी संस्थेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीमधील विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर (ऑफिशियल लँग्वेज आणि आयटी) पदासाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/बीई/एमसीए आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंगसाठी एमबीए (अॅग्री बिझनेस) आणि अकाउंट्स पदासाठी सीए/सीएमए उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिवसाठी 50% गुणांसह बीएससी (कृषी), ज्युनियर असिस्टंट (अकाउंट्स) साठी बी.कॉम आणि ज्युनियर असिस्टंट (जनरल) साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी शैक्षणिक गुणवत्तेत 5% ची सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

एक लाख रुपयांपर्यंत वेतन

वयोमर्यादेचा विचार केला तर 9 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय मोजले जाईल. यामध्ये असिस्टंट मॅनेजर पदांसाठी 18 ते 32 वर्षे आणि उर्वरित इतर सर्व पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असतील. नियमानुसार एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार असून असिस्टंट मॅनेजर पदासाठी रु. 40,000 ते 1,40,000 मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी रु. 30,000 ते 1,20,000 आणि ज्युनियर एक्झिक्युटिव व असिस्टंट पदांसाठी रु. 22,000 ते 90,000 प्रतिमहिना यादरम्यान वेतन दिले जाईल.

हे ही वाचा : मिसिंग लिंक : पहाटे तीनची वेळ, समोर कोसळती दरड अन् SOSचं बटण, तरुणांच्या प्रसंगावधानाची चर्चा

'असा' करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 1770 रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिकांना 590 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी cotcorp.org.in या वेबसाइटला भेट द्यावी.