Govt Jobs : 'बेस्ट'मध्ये वाहक पदासाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज, महिना 36 हजार पगार!

मुंबई तक

09 Jul 2026 (अपडेटेड: 09 Jul 2026, 03:56 PM)

BEST मध्ये कंडक्टर पदासाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जुलै आहे. यासाठी पात्रतेचे निकष, वेतन जाणून घ्या सविस्तर.

BEST Conductor Recruitment

BEST Conductor Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : 'बेस्ट'मध्ये वाहक पदासाठी भरती सुरु

point

लगेच करा अर्ज

point

महिना 36 हजार पगार!

BEST Conductor Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (बेस्ट) वर्ष 2026 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे 'बस वाहक' (कंडक्टर) या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुंबईमध्येच नोकरी करण्याची इच्छा असलेले आणि आवश्यक पात्रता धारक असलेल्या पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (RTO) वैध 'बसवाहक परवाना' (कंडक्टर लायसन्स) आणि बिल्ला (Badge) असणे बंधनकारक आहे. शारीरिक पात्रतेचा विचार केला तर उमेदवाराची उंची किमान 154 सेमी ते कमाल 178 सेमी दरम्यान आणि वजन किमान 45 किलो असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयात 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : "अशाने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते...", संजय राऊत पवारांवर भडकले

अर्ज कसा कराल?

या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क 900 रुपये ठेवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी 'बेस्ट' उपक्रमाच्या www.bestundertaking.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

हे ही वाचा : "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना 'बेस्ट' उपक्रमाकडून आकर्षक वेतन आणि भत्ते दिले जाणार आहेत. यामध्ये मूळ वेतन रुपये 22060 रुपये असून, त्यासोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि गणवेश धुलाई भत्ता मिळणार आहे. याशिवाय रजेचे रोखेकरण, रजा प्रवास भत्ता आणि उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुवर्ण सुविधा देखील कर्मचाऱ्यांना उपलब्ध होईल, ज्यामुळे उमेदवाराचे अंदाजे एकूण मासिक वेतन सुमारे 36,000 रुपयांच्या घरात जाणार आहे.