Mumbai News : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली होती. पावसामुळे शेकडो झाडं पडली, अनेक मृत्यू झाले. यामुळे सरकारवर जोरदार टीका झाली झाली. यानंतर आता महाराष्ट्र सरकारने मुंबईला पुराच्या संकटापासून कायमची मुक्ती देण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने 13 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी पूर-नियंत्रण आराखडा जाहीर केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
ADVERTISEMENT
30 मिनिटांत होणार निचरा
या योजनेअंतर्गत 370 पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा म्हणजेच हॉटस्पॉटचा शोध घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत हे हॉटस्पॉट्स पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. या हॉटस्पॉट्सच्या ठिकाणी अशी यंत्रणी उभारली जाणार आहे जी 30 मिनिटांत या पाण्याचा निचरा करेल. तसेच या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेज यंत्रणा आधुनिक आणि अद्ययावत करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले
फडणवीस काय म्हणाले?
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, यंदा झालेला पाऊस हा अभूतपूर्व आणि विक्रमी स्वरूपाचा होता. सामान्यतः जुलै महिन्यात कुलाबा येथे सरासरी 734 मिमी आणि सांताक्रूझ येथे 856 मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा जुलैच्या पहिल्या केवळ सहा दिवसांतच कुलाबा येथे 882 मिमी (जुलैच्या सरासरीच्या 111%) तर सांताक्रूझ येथे 988 मिमी (जुलैच्या सरासरीच्या 102%) इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली.
हे ही वाचा : पुणे : कचऱ्याचा डोंगर खाली सरकला, इमारत दबली गेली; 3 जणांचे पाय पिलरखाली
रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरावर ताण
मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात सरासरी 2,318 मिमी पाऊस पडतो. मात्र गेल्या चार दिवसांतील संपूर्ण हंगामाच्या सरासरीच्या 42% इतका पाऊस पडला. यामुळे शहरावर ताण आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या नवीन प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी विधानसभेत व्यक्त केला.
ADVERTISEMENT












