Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. 8 जुलै 2026 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर विभागातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज जारी करण्यात आला. दरम्यान, एकूण हवामान विभागाच्या अंदाजानुसार 9 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट: पावसामुळे कर्मचाऱ्याने रजा मागितली, मॅनेजरनं थेट नाकारली; स्क्रीनशॉट व्हायरल
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर नाशिक घाटमाथा या सर्वच जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या दोन ठिकाणी पावसाचा ऑरेंजचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : लातूर: ड्रायव्हर फोनवर बोलत होता, शाळेची बस पलटी होऊन अपघातात 23 विद्यार्थी जखमी
विदर्भ
विदर्भ विभागात अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि बुलढाणा या जिल्ह्यांत हवामानाचा कोणताही अलर्ट नाही. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT












