Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट, जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

मुंबई तक

08 Jul 2026 (अपडेटेड: 08 Jul 2026, 06:45 PM)

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. अशातच काही जिल्ह्यांना यलो तर काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच राज्यातील काही भागांत रेड अलर्टचा अंदाज आहे, दरम्यान 8 जुलै रोजी राज्यातील हवामान कसं असेल याचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या मान्सूनने धुमाकूळ घातला

point

8 आणि 9 जुलै रोजी जिल्ह्यांना यलो आणि 2 ठिकाणी ऑरेंज अलर्टचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मुसळधार ते अति मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. अशातच काही जिल्ह्यांना यलो तर काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत रेड अलर्टचा अंदाज आहे, दरम्यान, 8 जुलै रोजी राज्यातील हवामान कसं असेल याचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोंबिवलीत शिंदे सेनेच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टरला मारहाण, Video व्हायरल

कोकण 

कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली असून पावसाचा यलो अलर्ट आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट वर्तवण्यात आला. तसेच मुंबई आणि ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.  

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सातारा घाटमाथा आणि  पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आलाय. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे.  

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर नाशिक घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्टचा अंदाज आहे. 

मराठवाडा : 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव येथे हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवलेलाय. 

हे ही वाचा : केतनच्या हत्येपूर्वी सियाचे चेतनशी सिक्रेट लग्न, साक्षीदार म्हणून मित्रांची स्वाक्षरी

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिम, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट नाही, असं हवामान विभागाने स्पष्ट केले.