Maharashtra Weather : जुलैमध्ये पावसाची दांडी, राज्यात असं का घडतंय? हवामान विभागाची अपडेट

मुंबई तक

• 05:00 AM • 12 Jul 2026

Maharashtra Weather : अचानकपणे गेली दोन दिवस पावसाने दांडी मारली आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आता राज्यातील नागरिक घामाघूम होताना दिसत आहेत. अशातच जाणून घेऊयात 12 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाची दमदार हजेरी

point

अचानक कुठे गायब झाला?

Maharashtra Weather : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र अचानकपणे गेली दोन दिवस पावसाने दांडी मारली आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आता राज्यातील नागरिक घामाघूम होताना दिसत आहेत. अशातच जाणून घेऊयात 12 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, रोहित पवारांनी पत्रिका केली शेअर, कोण आहेत कायनात धार?

कोकण 

कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूणच पावसाचा कोणताही अलर्ट वर्तवण्यात आलेला नाही. 

उत्तम महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : पालघरमध्ये पुराचे पाणी घरात शिरले, छतावर चार तास मृतदेहासोबत कुटुंब

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने कसलाही अंदाज वर्तवलेला नाही.