Jejuri Warkari Accident : पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ टेम्पोने वारकऱ्यांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहा वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यापैकी तीन वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वारकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीत, सुनेचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल
जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातातील जखमींपैकी तिघा वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांची नावेही समजू शकलेली नाहीत. उर्वरित जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लक्षात घेऊन वैद्यकीय उपचार केले जात आहेत. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी लागणार, हवामान विभागाची अपडेट
टेम्पो वारकऱ्यांच्या गर्दीत घुसल्याने दुर्घटना
माऊलींची पालखी आज सासवडमधून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करत असताना हा अपघात घडला. जेजुरीत पालखी दाखल झाल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर वारी सुरू असताना टेम्पो वारकऱ्यांच्या गर्दीत घुसल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत जवळपास सहा वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघातानंतर जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वारीदरम्यान मोठी दुर्घटना घडल्याची चर्चा सुरू असून मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांवर उपचार सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
रोहित पवारांनी व्यक्त केली हळहळ
रोहित पवार फेसबुक पोस्ट म्हणाले, दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने जेजुरीजवळ 3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेत काही वारकरी जखमी झाले असून ते लवकर बरे व्हावेत, ही श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना! हा अपघात कसा झाला याची सखोल चौकशी करुन पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊन प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, ही विनंती!
ADVERTISEMENT












