Govt Jobs : भारतीय नौदलात 12 वी उत्तीर्णांना मोठी संधी, थेट ऑफिसरपदी नियुक्ती

भारतीय नौदलात परमनंट कमिशन अंतर्गत ऑफिसर पदांवर करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 मे पासून सुरू होणार आहे.

Indian Navy

Indian Navy

मुंबई तक

26 May 2026 (अपडेटेड: 26 May 2026, 03:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च नौदलाद्वारे

point

12 वी उत्तीर्णांना मोठी संधी

point

थेट ऑफिसरपदी नियुक्ती

Indian Navy : भारतीय नौदलात (Naval Headquarters) परमनंट कमिशन अंतर्गत ऑफिसर पदांवर करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. '10+2 (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम - जानेवारी 2027' या अभ्यासक्रमासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 60 उमेदवारांची निवड केली जाईल, ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 30 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिशन इंजिनिअरिंगसाठी 30 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अविवाहित महिला आणि पुरुष दोघांनाही या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार असून, महिलांसाठी एकूण 8 जागा (प्रत्येक शाखेत 4 जागा) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या कॅडेट्सना 4 वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून (JNU) बी.टेक पदवी प्रदान केली जाईल आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च भारतीय नौदलाद्वारे केला जाईल.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 10+2 (बारावी) किंवा समकक्ष परीक्षा भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Maths) म्हणजेच PCM या विषयात किमान 70% गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात किमान 50% गुण असणे बंधनकारक आहे. तसेच, सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवाराने 'जेईई मेन 2026' (JEE Main 2026) परीक्षा दिलेली असावी. या भरतीसाठी वयोमर्यादा आणि इतर सविस्तर पात्रता निकष जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : बायकोला प्रेयसीच्या घरी नेलं, अन् सासऱ्यांना सांगितली 'ती' गोष्ट, भयंकर कांड उघडकीस

अशी केली जाईल निवड

उमेदवारांची निवड केवळ बारावीच्या गुणांवर न होता, 'जेईई मेन 2026' च्या कॉमन रँक लिस्ट (CRL) च्या आधारे केली जाईल. प्राप्त अर्जांमधून गुणवत्ता यादी तयार करून पात्र उमेदवारांना एसएसबी (SSB Interview) मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर वैद्यकीय परीक्षा (Medical Examination) आणि पोलीस चारित्र्य पडताळणी (Police Verification) केली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर करून त्यांना जानेवारी 2027 मध्ये सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सामावून घेतले जाईल.

हे ही वाचा : रात्री सगळे गाढ झोपले, सकाळी चिमुकलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग; कुणी केले अत्याचार?

अर्जाची शेवटची तारीख काय?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 मे पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जून आहे. उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच www.joinindiannavy.gov.in ला भेट देऊन आपले अर्ज विहित मुदतीत सबमिट करावेत. शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक अडचण टाळण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.