बार्शी : प्रेमविवाह अन् सोनेरी स्वप्न, पण बिअर बारसमोर संसाराची राखरांगोळी!

Barshi Crime News : बार्शीतील गाडेगाव रोड परिसरात पतीने पत्नीची चाकूचे 50 वार करुन हत्या केली आहे. या क्रूर हिंसेमागील धक्कादायक कारणही समोर आलंय.

Barshi Crime News

Barshi Crime News

मुंबई तक

26 May 2026 (अपडेटेड: 26 May 2026, 12:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बार्शी : प्रेमविवाह अन् सोनेरी स्वप्न

point

पण बिअर बारसमोर संसाराची राखरांगोळी!

Barshi Crime News, विजय बाबर : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील (Barshi Crime News) गाडेगाव रोड परिसरात सोमवारी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. धनश्री पाटील असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर पती ऋषिकेश पाटील हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झालाय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : समजून घ्या: कच्चं तेल स्वस्त झालं तरीही पेट्रोल-डिझेल का महाग... सरकार का करतंय असं?

ऋषिकेशचे धनश्रीवर 50 वार, बिअर बारसमोर क्रूर हत्या 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी बार्शी-परंडा रोडवरील एका बिअर बारसमोर धनश्री यांना अडवून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपीने तब्बल 50 वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे दोघांनी प्रेम विवाह करुन सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. मात्र, प्रेमाची जागा संशयाने घेतली. नवरा संशयातून इतका क्रूर बनला की त्याने बायकोला भर रस्त्यात क्रूरपणे संपवलंय. (Barshi Crime News)

हेही वाचा : मुंबई : मरिन ड्राईव्हवर थरार, गाडी थांबवण्याचा इशारा पण मर्सिडिजने दोन पोलिसांना चिरडलं!

वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेल्या संशयातून खून

घटनेदरम्यान परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी धनश्री यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्री यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. (Barshi Crime News)

हत्या केल्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी सिटी पोलीस स्टेशन येथे हजर झाला.घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. (Barshi Crime News)

दरम्यान, ऋषिकेश आणि धनश्री यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेल्या संशयातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.या घटनेमुळे बार्शी शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.(Barshi Crime News)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

डोळ्यांवर अ‍ॅसिड ओतलं, त्याचं गुप्तांग चिरडलं; बाभळीच्या झाडावर... भयंकर कृत्य