Maharashtra Weather : राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, 23 जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई तक

26 May 2026 (अपडेटेड: 26 May 2026, 09:49 AM)

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून विविध भागांसाठी वेगवेगळे अलर्टचा अंदाज आहे. राज्यातील कोकण, मुंबई महानगर परिसर आणि विदर्भात 6 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानात मोठा बदल

point

विविध भागांसाठी वेगवेगळे अलर्टचा

Maharashtra Weather Alert: राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून विविध भागांसाठी वेगवेगळे अलर्टचा अंदाज आहे. राज्यातील कोकण, मुंबई महानगर परिसर आणि विदर्भात 6 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट लजारी करण्यात आला, विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला, तर 2 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्टची शक्यता वर्तवली आहे. पुढील 24 तास महत्त्वाचे असून जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बुलढाण्यात बापानं चारही पोरांना विहिरीत फेकलं अन्... मन सून्न करणारी घटना

कोकण 

कोकण विभागातील पालघप, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. याच विभागात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामानात मोठा बदल घडण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच विभागांत मेघगर्जनेसह पावसासह विजांचा कडकडाट जाणवेल, काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना अधिकृत अलर्ट जारी केला नसला तरीही, काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

हे ही वाचा : Pune crime : भररस्त्यात पीडितेला गुप्तांग दाखवून.. लाज आणणारी घटना

विदर्भ 

विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवला. याच भागांत तापमान अत्यंत उच्च पातळीवर जाण्याची अधिक शक्यता आहे. दुपारी नागरिकांनी वेळेतच बाहेर पडावं, असे अवाहन हवामान विभागाने दिलं.