जालना : दारूसाठी पैसे देण्यास नकार, मावस भावासोबत भयंकर..

मुंबई तक

26 May 2026 (अपडेटेड: 26 May 2026, 09:13 PM)

Jalna crime : जालन्यात मन थक्क करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने मावसभावाने तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंठा शहरातील जवाहरलाल कॉलनी परिसरात हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतं.

Jalna crime

Jalna crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार

point

आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा

Jalna Crime : गौरव साळी - जालन्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाने तरुणाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंठा शहरातील जवाहरलाल कॉलनी परिसरात हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. आरोपीचं नाव कलीम महमूद शेख (वय 22) अशी मृत तरुणाची ओळख समोर आलेली आहे, तसेच ज्याने खून केला त्याची शकील शेख अशी ओळख समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : भयंकर! आंबे आणण्यासाठी मुलगी गेली, तोंडात कापड अन् नग्नवस्थेत...

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार

घडलेल्या घटनेनुसार, जालन्याच्या मंठा शहरात दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिलेल्या शकील शेखची त्याचाच मावस भाऊ कलीम शेखने हत्या केली. मंठा शहरातील जवाहार वसाहतीत देशी दारूच्या दुकानामागील एका खोलीत हा धक्कादायक प्रकार घडला. शकीलने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांत मोठा वाद झाला. याच वादातून शकीलने मावस भाऊ कलीम शेखचे विटेने टोकं ठेचलं. या हल्ल्यात कलीम गंभीर जखमी झाला. 

हे ही वाचा : तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत.. लाज आणणारी घटना

आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळपणे मंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत घोषित केलं. संबंधित घटनेची माहिती उघडकीस होताच, मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत, प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास होत आहे.