पतीने स्वत:च कापलेलं प्रायव्हेट पार्ट, पण पत्नीने 'या' कामात का केलली नवऱ्याची मदत?

Uttar Pradesh Shocking Viral News : रामपूरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि तृतीयपंथी बनला. कारण त्याची नजर सहकारी तृतीयपंथीयांच्या परिसरावर होती.

Uttar Pradesh Shocking Viral News

Uttar Pradesh Shocking Viral News

मुंबई तक

28 Jul 2025 (अपडेटेड: 30 Jul 2025, 06:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी त्या तृतीयपंथीयांना केली अटक

point

त्या व्यक्तीने स्वत:चं लिंग का कापलं?

point

रामपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh Shocking Viral News : रामपूरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि तृतीयपंथी बनला. कारण त्याची नजर सहकारी तृतीयपंथीयांच्या परिसरावर होती. तो दिल्लीला जाऊन किन्नर बनला आणि त्याच्या पत्नीने इतर तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल केला. या तृतीयपंथीयांनी जबरदस्ती लिंग कापलं, असा आरोप केला जात आहे. ज्या तृतीयपंथीयांवर आरोप केला गेला, पोलिसांनी त्यांनाही तुरुंगात पाठवलं. पण आता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे आणि मुख्य आरोपी आणि त्याच्या पत्नीला पकडलंय.

हे वाचलं का?

रामपूरमध्ये नेमकं काय घडलं?

तृतीयपंथीयांसाठी पैसे कमवण्याचा पर्याय हा त्यांचा परिसर असते. प्रत्येक तृतीयपंथीयाचा एक विभाग असतो. त्यांचं क्षेत्रच ही त्यांची मोठी संपत्ती असते. पण सहकारी तृतीयपंथीयांच्या परिसरावर कब्जा करण्यासाठी एक व्यक्ती स्वत:च तृतीयपंथी बनला. रामपूरच्या शाहाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत काम करणाऱ्या तृतीयपंथीयासोबत काम करणाऱ्या एका डान्स पार्टी कर्मीने प्लॅन केला. त्याने दिल्लीला जाऊन स्वत: त्याचं लिंग कापून परिवर्तन केलं. त्यानंतर त्याच्या पत्नीने पतीसोबत काम करणाऱ्या तृतीयपंथीयांवरच आरोप केला की, जबरदस्ती लिंग परिवर्तन करून, पतीला तृतीयपंथी बनवलं.

हे ही वाचा >> Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...

पोलिसांनी आरोपी तृतीयपंथीयांविरोधात कारवाई केली. पण आता तपासात समोर आलं की, जो पीडित होता, तोच खरा आरोपी आहे आणि जे आरोपी होते, ते पीडित होते. दरम्यान, पोलिसांनी आता आरोपी आणि त्याच्या पत्नीला अटक केली. पोलिसांनी दोघांना जेलमध्ये पाठवलं आणि खोट्या आरोपाखाली अटक असलेल्या तृतीयपंथीयांना सोडण्यासाठी कार्यवाही केली.

याप्रकरणी रामपूरचे पोलीस अधीक्षक विद्यासागर मिश्र यांनी म्हटलंय की, महिलेनं आरोप केला होता की, पतीला तृतीयपंथी बनवलं आहे. आरोप इतर तृतीयपंथीयांवर होता. त्यावेळी जे आरोपी होते, त्यांच्याविरोधात कारवाई केली गेली आणि जेलमध्ये पाठवलं. पण तपासात समोर आलं की,जो पीडित होता, त्याने आपल्या मर्जीने लिंग परिवर्तन केलं होतं. दोघांनाही अटक केली आहे आणि ज्यांच्या विरोधात कारवाई केली गेली, त्यांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा >> ठाणे जिल्हा हादरला! आईनेच पोटच्या लेकरांच्या जेवणात मिसळलं विष, हादरून टाकणारी घटना

    follow whatsapp